UPI Transactions: सध्या सर्वजण डिजिटल पेमेंट करण्यास जास्त सोयीस्कर मानतात. सध्याच्या धावपळीच्या जीवनात पेमेंटची पद्धतही बदलली आहे. आता तुम्हाला UPI पेमेंट केल्यानंतर वाट पाहण्याची गरज नाही. कारण तुम्ही फक्त एक क्लिक करून क्षणार्धात पेमेंट करू शकता. खरंतर, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) च्या पेमेंट पद्धती बदलल्या आहेत. पूर्वी हे पेमेंट 30 सेकंदात होत असे. आता ते अर्ध्या वेळेत होईल. म्हणजेच, पेमेंट 10-15 सेकंदात होईल. आता तुम्हाला जास्त वाट पाहावी लागणार नाही. नवीन नियमांमधील हा बदल 16 जून 2025 लागू झाला आहे.
गेल्या महिन्यात NPCI ने बँका आणि पेमेंट अॅप्सना त्यांच्या सिस्टम अपग्रेड करण्यास सांगितले होते, जेणेकरून पेमेंट फक्त 15 सेकंदात होईल. हे नियम सोमवारपासून लागू झाले आहेत. NPCI ने काही तांत्रिक गोष्टी बदलल्या आहेत, ज्या API म्हणजेच अॅप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेसशी संबंधित आहेत. सोप्या भाषेत सांगायचे तर, ही सॉफ्टवेअर सिस्टम आहेत जी तुमचे पेमेंट एका बँकेतून दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करते.
UPI व्यवहार जलद होणार -
दरम्यान, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने 26 एप्रिल 2025 रोजी सांगितले की ते कामगिरी सुधारण्यासाठी UPI व्यवहारांचा प्रतिसाद वेळ कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. हा बदल बँका, सेवा प्रदाते फोनपे, गुगल प्ले आणि पेटीएम इत्यादींसाठी फायदेशीर ठरणार आहे.
हेही वाचा - PhonePe, Google Pay, Paytm वरून UPI ट्रान्सफर करताना पैसे अडकले आहेत का? 'या' स्टेप्स फॉलो करून दूर होईल समस्या
याशिवाय, रिस्पॉन्स व्यवहारांची स्थिती तपासण्यासाठी आणि व्यवहार उलट करण्यासाठी म्हणजेच व्यवहार रद्द करण्यासाठी किंवा मागे घेण्यासाठी प्रतिसाद वेळ 10 सेकंदांपर्यंत कमी करण्यात आला आहे. तथापी, NPCI ने सांगितले की प्रक्रियेच्या वेळेत बदल करण्याचा उद्देश ग्राहकांचा अनुभव सुधारणे आहे.
हेही वाचा -Tatkal Ticket New Rules: तात्काळ तिकिट बुकिंगबाबत मोठा बदल! 1 जुलैपासून 'हे' लोक करू शकणार नाहीत तिकिटं बुक
NPCI ने स्पष्ट केले आहे की, ग्राहक लवकरच त्यांच्या UPI अॅपद्वारे दिवसातून जास्तीत जास्त 50 वेळा त्यांच्या खात्यातील शिल्लक तपासू शकतील. तथापि, एका तज्ञाच्या मते, एका दिवसात बँक खात्यातील शिल्लक तपासण्यासाठी अद्याप कोणतीही मर्यादा नाही.