Sunday, April 20, 2025 05:58:58 AM

Numerology: या मूलांकांसाठी सोमवार ठरणार लकी! चांगली बातमी मिळेल; पण काही बाबतीत संयम महत्त्वाचा

अंकशास्त्र हे विशेषतः मूलांकवर आधारित आहे. तुमच्या जन्म तारखेची केलेली बेरीज करून जो अंक मिळतो, त्याला मूलांक म्हणतात.  तर, अंकशास्त्रानुसार 17 मार्च 2025 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, जाणून घ्या..

numerology या मूलांकांसाठी सोमवार ठरणार लकी चांगली बातमी मिळेल पण काही बाबतीत संयम महत्त्वाचा

Numerology: अंकशास्त्रात जन्मतारीख आणि त्यानुसार येणारा मूलांक महत्त्वाचा असतो. तोच तुमचा लकी नंबर ही असतो. यामध्ये तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्राच्या माध्यमातूनही महत्त्वाचे अंदाज वर्तवले जातात.

अंकशास्त्रामध्ये प्रत्येक अंकाला विशेष महत्त्व आहे. अंकशास्त्र हे विशेषतः मूलांकवर आधारित आहे. तुमच्या जन्म तारखेची केलेली बेरीज करून जो अंक मिळतो, त्याला मूलांक म्हणतात. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेला झाला असेल तर त्याचा मूलांक 1 असेल. म्हणजेच, 2 + 8 = 10, 1+0=1. अंकशास्त्रात, गणना मूळ संख्येच्या आधारे केली जाते. मूळ संख्या म्हणजे जन्मतारखेतील अंकांची बेरीज. तर, अंकशास्त्रानुसार 17 मार्च 2025 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, जाणून घ्या..

हेही वाचा - Numerology: हा मूलांक असलेल्या सूनबाईंचं सासूबाईंबरोबर चांगलं पटतं; खुशामत नाहीत करत कधीच, तरीही जबरदस्त बाँडिंग असतं

मूलांक 1
सोमवारचा दिवस चांगला राहणार आहे. व्यवसायात प्रगती होईल. धन मिळू शकते. समाजात नाव आणि प्रतिष्ठा वाढेल. व्यवसायात प्रगती होईल. भावंडांसोबत चर्चा करताना सौम्य शब्दांचा वापर करावा आणि संयमाने वागावे. या गोष्टींकडे लक्ष दिले नाही तर तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते.

मूलांक 2
सोमवारी दिवसभर काही ना काही काळजी वाटत राहील. पैशाच्या बाबतीत फारशी गुंतागुंत किंवा अडचण होणार नाही. बऱ्याच दिवसांपासून अडकलेले पैसे अचानक मिळू शकतात किंवा रखडलेले काम होऊ शकते. रागीटपणा केल्यास रक्तदाब वाढू शकतो. संयम बाळगला तर सर्व काही ठीक होईल. भगवान शंकराची उपासना लाभदायक ठरेल.

मूलांक 3
सोमवारचा दिवस सर्वसाधारण असेल. लोकांना कोणताही महत्त्वाचा सल्ला देणं टाळा; अन्यथा, तुमचा सल्ला चुकीचा सिद्ध होईल. विरोधकांपासून त्रास होऊ शकतो. यावर उपाय म्हणून तुमच्या पत्नीला तिच्या हातानं तुमच्या कपाळावर हळदीचा टिळा लावण्यास सांगा. हा उपाय करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

मूलांक 4
सोमवारचा दिवस काळजीत भर घालणारा आहे. तुम्हाला अचानक दुखापत होण्याची शक्यता असल्याने सावध रहा. मन विचलित राहील. तेव्हा महत्त्वाचं निर्णय घेताना घाई-गडबड करू नका. शक्य असेल तर हा विचार पुढे ढकला. घरी पूजा-विधी आयोजित केल्यास फायदेशीर ठरेल. तसेच, अध्यात्मिक वाचन केल्यास लाभदायी ठरेल. नेहमीसाठी ही सवय ठेवल्यास मनःशांती मिळेल.

मूलांक 5
आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. तुमच्या विचारानुसार गोष्टी घडतील.  नशिबाची साथम मिळेल. रागावर नियंत्रण ठेवा. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ आनंदात जाईल. जोडीदाराला अचानक शारीरिक त्रास जाणवू शकतो. जोडीदाराची विचारपूस करा. त्यामुळे तुमचं नातं अधिक सकारात्मक होईल.

मूलांक 6
सोमवारचा दिवस सामान्य असेल. व्यवसायाशी संबंधित एखादी चिंता लागून राहू शकते. तुमचे सहकारी तुम्हाला उलट-सुलट गोष्टींवरून चिथवू शकतात. पण अशा बोलण्यावर विश्वास ठेवून काही निर्णय घेण्याचे किंवा चिडून बोलण्याचे टाळा. संयम ठेवणं उपयुक्त ठरेल. तुम्ही तुमच्या बहीण किंवा मुलीला भेटवस्तू दिलीत तर, तुम्हाला फायदा मिळू शकतो.

मूलांक 7
सोमवारचा दिवस अडथळे वाढवणारा असेल. तुम्हाला दुखापत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावध रहा आणि वाहन जपून चालवा. रक्ताशी संबंधित काही आजार समोर येऊ शकतो. येणारे पैसे अचानक कुठेतरी अडकण्याची शक्यता आहे. जोडीदार तुमच्याशी काही मुद्द्यांवरून वाद घालू शकतो. कुटुंबातील वातावरण प्रेमळ आणि खेळीमेळीचं ठेवण्यासाठी प्रयत्नशील रहा.

हेही वाचा - God Is Real : देव खरंच आहे..! हार्वर्डचे शास्त्रज्ञ डॉ. विली सून यांचा दावा; हे सिद्ध करणारे गणितीय सूत्र उलगडले

मूलांक 8
अडथळ्यांचा सामना करावा लागेल. सोमवारच्या दिवसाची सुरुवात चांगली होईल. पण दिवस जसा पुढे जाईल तशी चिंता वाढेल. आळस दूर करण्यासाठी सकाळी दूध किंवा पाण्यात मध मिसळून प्या. यामुळे तुम्हाला दिवसभर उत्साही वाटेल. घरात तुमचं वर्तन फारसं चांगलं नसेल. त्यामुळे कुटुंबातील सदस्य तुमच्यावर नाराज होऊ शकतात.

मूलांक 9
सोमवार दिवस चांगला आहे. मात्र, आक्रमक स्वभावावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. जर तुमच्या मनात अनेक दिवसांपासून शुभ कार्य आयोजित करण्याची इच्छा असेल तर, त्यावर विचार करून नियोजन करू शकता. घरात दिवसभर आनंदाचं वातावरण असेल. समस्यांवर उपाय म्हणून श्री हनुमानाला गोड पान अर्पण करा. हनुमंताची उपासना नेहमी करा. यामुळे समस्या दूर होऊन लाभ मिळेल.

(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)


सम्बन्धित सामग्री