Numerology : या मूलांकाच्या स्त्रिया खंबीर, स्वावलंबी आणि बुद्धिमान असतात. लग्नापूर्वी या महिला त्यांच्या करिअरवर लक्ष केंद्रित करतात आणि लग्नानंतर ती कुटुंबाकडेही चांगले लक्ष देतात. जीवनातील संघर्षात प्रत्येक आव्हानाला स्वतःच्या बुद्धिमत्तेने आणि आत्मविश्वासाने सामोरे जाण्याची धमक त्यांच्यात असते.
अंकशास्त्रामध्ये प्रत्येक अंकाला विशेष महत्त्व आहे. अंकशास्त्र हे विशेषतः मूलांकवर आधारित आहे. तुमच्या जन्म तारखेची केलेली बेरीज करून जो अंक मिळतो, त्याला मूलांक म्हणतात. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेला झाला असेल तर त्याचा मूलांक 1 असेल. म्हणजेच, 2 + 8 = 10, 1+0=1. अंकशास्त्रात, गणना मूळ संख्येच्या आधारे केली जाते. मूळ संख्या म्हणजे जन्मतारखेतील अंकांची बेरीज.
हेही वाचा - Mangal Rashi Parivartan : ‘या’ तीन राशींना मंगळ देणार खोऱ्याने पैसा; धनलाभासह परदेशवारी आणि नवी नोकरीही पक्की!
अंकशास्त्रामध्ये अंकांना विशेष महत्त्व आहे. एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्या व्यक्तीचे जीवन कसे असेल याचा अंदाज बांधता येतो. अंकशास्रानुसार ज्या लोकांचा जन्म 3, 12, 21 आणि 30 तारखेला झाला असेल त्यांचा मूलांक 3 असतो. या मूलांकचा स्वामी देव गुरू असतो. त्यांना अपत्य, ज्ञान, शिक्षण, आणि धार्मिक कार्यांचा कारक मानले जाते.
मूलांक 3 च्या महिला हुशार, स्वावलंबी आणि व्यवहारी असतात. त्या अभ्यासात हुशार असतातच आणि प्रत्येक विषयावर त्यांचे मत मांडण्यास सक्षम असतात. लहानपणापासूनच त्या आई-वडिलांच्या लाडक्या असल्याने त्यांना कुटुंबात विशेष प्रेम आणि आदर मिळतो. अशा महिला लग्नापूर्वी करिअरवर लक्ष केंद्रित करतात आणि लग्नानंतर त्या कुटुंबाची देखील चांगली काळजी घेऊ शकतात. अशा महिलांची वैशिष्ट्यं जाणून घेऊया.
लग्नापूर्वीचं जीवन
या महिला त्यांच्या करिअर आणि शिक्षणाबाबत खूप गंभीर असतात. बहुतांशी महिला उच्च शिक्षण घेतात आणि चांगली नोकरी मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करतात. त्यांना पैसे वाचवण्याची सवय असते आणि प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करतात. त्यांचा आत्मविश्वास खूप मजबूत असतो, ज्यामुळे त्यांना प्रत्येक निर्णय स्वतःच घ्यायला आवडतं. जरी त्या प्रेमात पडल्या तरी त्या चांगल्या आर्थिक स्थिती असलेल्या सुशिक्षित व्यक्तीचीच निवड करतात.
या कार्यक्षेत्रात मिळते यश
मूलांक 3 असणाऱ्या लोकांना सरकारी नोकरी मिळू शकते. ते पोलीस, प्रशासकीय अधिकारी, बँक अधिकारी किंवा धार्मिक तज्ज्ञ बनू शकतात. या मूलांकचे लोक कोणतेही काम खूप मनापासून करतात. शिक्षक, लेखक, सेल्समॅन, प्रोफेसरही बनू शकतात. मेहनतीच्या जोरावर ते आयुष्यात यशस्वी होतात.
लग्नानंतरचं जीवन
लग्नानंतर या महिला आपल्या कुटुंबाची जबाबदारी योग्य प्रकारे घेतात. त्या घर आणि नोकरी दोन्ही हाताळण्यास सक्षम असतात. त्यांचे पतीसोबतचे नाते प्रेमाने भरलेले असते, पण पती निष्काळजी वागत असेल किंवा खोटे बोलत असेल तर ते त्यांना लगेच समजतं आणि त्या अशा गोष्टींना निर्भीडपणे विरोधही करतात. त्या प्रत्येक नातं मनापासून निभावतात; पण चुकीची गोष्ट खपवून घेत नाहीत.
सासरच्यांशी नातं
लग्नानंतर अशा महिलांना काही वेळा सासरच्या घरात आव्हानांना सामोरे जावे लागते, कारण त्या कोणाचीही खुशामत करत नाहीत आणि जे योग्य असेल तेच बोलतात. मात्र, कालांतराने त्यांच्या वागण्या-बोलण्यात आणि हुशारीमुळे कुटुंबातील सदस्यांना त्यांची योग्यता लक्षात येते. या कारणास्तव, मूलांक 3 असलेल्या स्त्रिया सासूची आवडती सून असतात आणि दोघींमध्ये मैत्रीपूर्ण नातं असतं. सासू-सासरे आणि पती दोघांचेही त्या महिलांना अपार प्रेम मिळते.
हेही वाचा - Holi 2025 : 'या' राशींचे लोक 14 मार्चपासून जगतील विलासी जीवन, शश आणि मालव्य राजयोगासह मिळणार शनिदेवांची कृपा
मुलांच्या भविष्याविषयी असतात दक्ष
मूलांक 3 च्या स्त्रिया त्यांच्या मुलांच्या शिक्षण आणि संगोपनाकडे विशेष लक्ष देतात. आपल्या मुलांनी अभ्यासात प्रावीण्य मिळवावे आणि यशस्वी व्हावे अशी त्यांची मनापासून इच्छा असते. अनेक वेळा त्या आपल्या मुलांच्या भविष्यात इतक्या व्यस्त होतात की त्या आपल्या पतींना वेळ देऊ शकत नाहीत, ज्यामुळे काही तणाव निर्माण होण्याची शक्यता असते.
अडचणीच्या वेळी भावंडांची मदत मिळते
या मूलांकच्या लोकांना त्यांच्या भावंडांची मदत मिळते. अडचणीच्या वेळी भाऊ-बहीण मदतीला धावतात. या लोकांना भरपूर मित्र-मैत्रीणी असतात. आई वडिलांचे त्यांच्यावर खूप प्रेम असते. हे लोक खूपच शिस्तप्रिय असतात. इतरांप्रती दयाळू आणि मनमिळाऊ असतात. कोणीतरी आपल्याला फसवेल की काय, दगा देईल काय, अशी शंका नेहमी त्यांच्या मनामध्ये असते.
(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)