Saturday, January 18, 2025 07:30:22 AM

Oath Ceremony of Maharashtra Government
शपथविधीचा मुहूर्त ठरला, या तारखेला होणार शपथविधी

महाराष्ट्रात नव्या सरकारचा शपथविधी गुरूवारी 5 डिसेंबरला होणार आहे.

शपथविधीचा मुहूर्त ठरला या तारखेला होणार शपथविधी

मुंबई : महाराष्ट्रात नव्या सरकारचा शपथविधी गुरूवारी 5 डिसेंबर 2024 रोजी संध्याकाळी 5 वाजता होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थित हा सोहळा पार पडणार आहे. मुंबईतील आझाद मैदानात हा शपथविधी पार पडणार आहे. याबाबतची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्स या सोशल मीडियावर अकाउंटवरून दिली आहे.

 

शपथविधीसाठी मैदान ठरत नसल्याचे चित्र शनिवारपर्यंत दिसत होते. शिवाजी पार्कमध्ये शपथविधी होणार असल्याची चिन्ह होती. परंतु शिवाजी पार्कवर शपथविधीला भाजपाच्या नेते आणि कार्यकर्त्यांची नापसंती होती. शिवाजी पार्कवर शपथविधी झालेले एकही मंत्रिमंडळ आतापर्यंत त्यांचा कार्यकाळ पूर्ण करू शकले नसल्याचे भाजपाच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी सांगितले. शपथविधीसाठी मैदान ठरले. तरीही महायुतीतील कोणत्या पक्षाला कुठले खाती मिळेल याबाबतची माहिती गुलदस्त्यात आहे. महत्त्वाची खाती कुठल्या पक्षाला मिळतील हे पाहणे महत्त्वाचे आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुक पार पडल्यानंतर मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा होणार यावरून चर्चा सुरू होत्या. दिल्लीत महायुतीची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत याचे चित्र स्पष्ट झाले. महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री होणार यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर भाजपाचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील हे जवळपास निश्चित आहे. परंतु यावर अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. मुख्यमंत्री भाजपाचा होणार असल्याने शिंदे नाराज असल्याचे चित्र दिसत आहे. कारण शिवसेनेकडून एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री व्हावे असा आग्रह होता.

शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, गृहखाते कणखर नेत्याला मिळायला हवे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे गृहखाते होते. आता मुख्यमंत्रीपद भाजपाकडे जात आहे. तर गृहखाते शिवसेनेला मिळायला हवे असे शिरसाट म्हणाले आहेत.     


सम्बन्धित सामग्री