मुंबई: सरकारी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तेल आणि नैसर्गिक गॅस कॉर्पोरेशन लिमिटेडने (ONGC) 2623 हून अधिक पदांसाठी भरती जाहीर केली आहे. कंपनी त्यांच्या विविध व्यवसाय आणि विभागांमध्ये अप्रेंटिसशिप प्रशिक्षणासाठी पात्र उमेदवारांची निवड करेल. जर तुम्हाला नवीन नोकरी शोधण्यास अडचण येत असेल, तर तुम्ही अप्रेंटिसशिप पूर्ण करून अनुभव मिळवू शकता. इतकंच नाही, तर प्रशिक्षणादरम्यान, शिकाऊ कामगारांना (Paid Apprenticeship) मानधन देखील मिळेल.
ओएनजीसी अप्रेंटिस रिक्त पदांसाठी अर्ज 17 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन अप्रेंटिस पोर्टलवर सुरू झाले आहेत, ज्यामध्ये उमेदवार शेवटची तारीख 6 नोव्हेंबर 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.
भरती करण्याऱ्या संस्थेचे नाव - तेल आणि नैसर्गिक गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ONGC)
जागा - ट्रेड, पदवीधर आणि डिप्लोमा अप्रेंटिस
विभाग आणि पद संख्या - उत्तर विभाग (165), मुंबई विभाग (569), पश्चिम विभाग (856), पूर्व विभाग (458), दक्षिण विभाग (322) आणि मध्य विभाग (253)
शैक्षणिक पात्रता -
1 - ट्रेड अप्रेंटिस: 10वी, 12वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय, बी.कॉम, बीएससी, बीबीए, पदवीधर, डिप्लोमा, बीए, बीटेक अभियांत्रिकी पदवी इत्यादी पात्रता असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.
2 - वयोमर्यादा: 6 नोव्हेंबर 2025 रोजी उमेदवारांचे वय किमान 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 24 वर्षे असणे आवश्यक आहे. 6 नोव्हेंबर 2001 ते 6 नोव्हेंबर 2007 दरम्यान जन्मलेले उमेदवार सहभागी होण्यास पात्र आहेत. तसेच, एससी/एसटी उमेदवारांसाठी 5 वर्षे सूट मिळेल आणि ओबीसी उमेदवारांसाठी 3 वर्षे सूट मिळेल.
नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत
हेही वाचा: UPPSC RO ARO मुख्य परीक्षेसाठी अर्ज सुरू; अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा जाणून घ्या
फी - निशुल्क
अर्ज करण्याची पद्धत - ऑनलाईन
अधिक माहितीसाठी ongcindia.com या वेबसाईटवर क्लिक करा.