Wednesday, January 15, 2025 06:36:41 PM

Sanjay Raut Criticizes
‘वन नेशन, वन इलेक्शन’ प्रस्तावाला संजय राऊतांचा विरोध

मुंबईत मराठी माणसांचा हक्क मिळवून देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट लढाई लढेल.

‘वन नेशन वन इलेक्शन’ प्रस्तावाला संजय राऊतांचा विरोध


दिल्ली : शिवसेना नेते संजय राऊत यांची आज नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्र सरकारच्या ‘वन नेशन, वन इलेक्शन’ प्रस्तावाचा तीव्र विरोध व्यक्त केला. भारताच्या संघराज्य पद्धतीनुसार आणि प्रत्येक राज्याच्या वेगळ्या सामाजिक व राजकीय परिस्थितीनुसार, या प्रस्तावाची अंमलबजावणी योग्य नाही. ही योजना फक्त केंद्र सरकारच्या राजकीय फायद्यांसाठी आहे आणि राज्यांच्या स्वातंत्र्याच्या विरोधात आहे. त्यांनी २०२९ मध्ये मोदी पंतप्रधान असतील का, याबद्दलही प्रश्न उपस्थित केला.

राज्यांना त्यांच्या निवडणुका स्वयंपूर्णपणे घेण्याचा हक्क असावा. मुंबई महापालिका निवडणुका जोपर्यंत घेतल्या जात नाहीत, तोपर्यंत केंद्र सरकारने त्याच्या स्वार्थानुसार निर्णय घेतले आहेत, असं राऊत म्हणाले. त्यांचा आरोप होता की, मुंबईच्या महापौर निवडणुका लांबवण्यामागे केंद्र सरकारला पराभवाची भीती आहे.

'एक देश एक निवडणूक' प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

अजित पवार आणि शरद पवार यांच्यावर राऊतांचे भाष्य 
अजित पवार यांच्याशी भाजपची घनिष्ठता वाढल्यावर चिंता व्यक्त केली आणि सांगितले की, पक्ष तोडणे आणि बहुमत मिळवण्यासाठी इतर राजकीय पद्धती वापरण्याचा इतिहास असलेल्यांना महाराष्ट्राच्या संविधानावर हल्ला केला आहे. याच संदर्भात त्यांनी गौतम अदाणी यांचा उल्लेख करत म्हटले की, अदानी राजकीय हस्तक्षेप करत आहे. एक उद्योगपती महाराष्ट्राचं भविष्य कसा ठरवू शकतो? असा राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला. 

महाविकास आघाडीतील अस्वस्थता
राऊत यांनी महाविकास आघाडीतील अंतर्गत अस्वस्थतेवर भाष्य करत, भाजपने सत्तेचा आणि काळ्या पैशाचा वापर करून विरोधकांना दबावात आणले असल्याचा आरोप केला. त्यांनी सांगितले की, जर त्यांना अशा यंत्रणा असत्या, तर भाजपला पंधरा मिनिटांत खाली खेचता आले असते. तसेच, राऊत यांनी निवडणुका कागदी मतपत्रिकांवर घ्या असे आवाहन केले आणि निवडणुकीतील धोरणात्मक पराभवावर भाष्य केले.

मुंबई महापालिका निवडणुका पुढे ढकलण्याबद्दल राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या निवडणुकीसाठी तयारी करत असल्याचे सांगितले. त्यांनी म्हटले की, मुंबईत मराठी माणसांचा हक्क मिळवून देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट लढाई लढेल.

मंत्रिमंडळ विस्तारावर राऊत यांनी टिपण्णी केली आणि शिवसेनेच्या नाराजीनंतर असलेल्या राजकीय अस्वस्थतेवर भाष्य केले. त्यांना आरोप केला की शिंदे गट केवळ दिल्लीच्या आदेशावर नाचत आहेत आणि त्यांच्यामध्ये महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा अभाव आहे.


राऊत यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रा समर्थन करत, ही यात्रा केवळ दंगल माजवण्यासाठी नाही तर संपूर्ण देशाला एकत्र आणण्यासाठी आहे, असे सांगितले. त्यांनी फडणवीस आणि भाजपावर ईव्हीएमचा गैरवापर करून सत्ता मिळवण्याचा आरोप केला आणि निवडणुकीच्या पारदर्शकतेची आवश्यकता व्यक्त केली.


सम्बन्धित सामग्री