छत्रपती संभाजीनगर : तरुणाशी लग्न केल्यानंतर एका आठवड्यात तरुणी फरार झाली. या प्रकरणी तरुणाने पोलिसांकडे तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तरुणीचा शोध सुरू केला आहे. तरुणीच्या आईने मुलीला वडील नाहीत असे सांगितले आणि आर्थिक अडचणींची माहिती देत तरुणाकडून लग्नाआधी ५० हजार आणि लग्नानंतर अडीच लाख रुपये घेतले. हे पैसे अद्याप परत करण्यात आलेले नाही. या पैशांची नोंद पोलिसांनी गुन्हा नोंदवताना घेतली आहे.