Sunday, November 16, 2025 05:55:03 PM

एआय जगतात मोठी स्पर्धा! ChatGPT चा 'हा' प्लॅन आता वर्षभरासाठी मोफत; OpenAI कडून घोषणा, 'या' तारखेपासून सुरुवात

OpenAI कंपनीकडून नुकतीच एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. आता ChatGPT चे काही प्लॅन्स मोफत दिले जाणार आहे. AI कंपन्यांमधील स्पर्धेमुळे असा निर्णय घेतला गेला आहे.

एआय जगतात मोठी स्पर्धा chatgpt चा हा प्लॅन आता वर्षभरासाठी मोफत openai कडून घोषणा या तारखेपासून सुरुवात

ChatGPT Plan Free of Cost : काही वर्षांपूर्वी 5 जी इंटरनेटच्या स्पर्धेत डेटा स्वस्त झाला, तशीच काहीशी परिस्थिती आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या जगात निर्माण होण्याची शक्यता आहे. याच स्पर्धेचा एक भाग म्हणून, OpenAI कंपनीने आपल्या ChatGPT Go या लोकप्रिय प्लॅनच्या सेवा आता युजर्सला पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीकडून नुकतीच यासंदर्भात महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. 4 नोव्हेंबरपासून 'ChatGPT Go' हा प्लॅन मोफत वापरता येणार आहे.

ChatGPT चे विविध प्लॅन्स आणि सुविधा
OpenAI कडून सध्या वैयक्तिक आणि व्यावसायिक वापरासाठी विविध प्रकारचे प्लॅन्स देण्यात आले आहेत.
वैयक्तिक प्लॅन्स (Individual Plans)
1. ChatGPT Free Plan: हा प्लॅन पूर्णपणे मोफत असून, यात मर्यादित फाईल अपलोडिंग, संथ गतीने इमेज तयार करणे, मर्यादित मेमरी आणि डीप सर्चची सुविधा मिळते.
2. ChatGPT Go Plan: OpenAI ने जाहीर केल्यानुसार, येत्या 4 नोव्हेंबर 2025 पासून युजर्सना ChatGPT Go प्लॅनच्या सुविधा पूर्णपणे मोफत वापरता येणार आहेत. विशेष म्हणजे, यासाठी काही दिवसांची किंवा महिन्याची नव्हे, तर तब्बल एक वर्षाची (म्हणजे 4 नोव्हेंबर 2026 पर्यंत) मुदत देण्यात आली आहे. यापूर्वी, ChatGPT Go प्लॅनसाठी युजर्सना 399 रुपये प्रतिमहिना शुल्क भरावे लागत होते. मोफत झाल्यावर, युजर्सना फ्री प्लॅनमधील मर्यादित वापराऐवजी अधिक प्रमाणात सुविधांचा वापर करता येईल, तसेच प्रोजेक्ट, टास्क आणि जीपीटी तयार करण्याची अतिरिक्त सुविधा मिळेल. ChatGPT Go हा OpenAI कडून दिल्या जाणाऱ्या तीन वैयक्तिक प्लॅन्सपैकी एक आहे.
3. ChatGPT Plus Plan (1999 रुपये प्रतिमहिना): यात GPT-5 सह अत्याधुनिक पर्याय, व्हिडीओ तयार करणे आणि कोडेक्स एजंट यांसारख्या अतिरिक्त सुविधा मिळतात.
4. ChatGPT Pro Plan (19,900 रुपये प्रतिमहिना): या प्लॅनमध्ये Plus प्लॅनमधील सुविधांचा अमर्याद वापर आणि रिसर्च प्रिव्ह्यू सारख्या जवळजवळ सर्व सुविधा युजर्सना मिळतात.

हेही वाचा - Google Chrome Warning: गुगल क्रोम यूजर्ससाठी धोक्याची घंटा! एका क्लिकने होऊ शकतो डेटा चोरी आणि सिस्टिम हॅक

व्यावसायिक वापरासाठी प्लॅन्स (Business Plans)
1. ChatGPT Business Plan (Free): हा प्लॅन मोफत असून, यात GPT-5 चा वापर, मर्यादित फाईल अपलोड आणि संथ गतीने इमेज तयार करणे यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत.
2. ChatGPT Business Plan (२०९९ रुपये प्रतिमहिना): हा प्लॅन टीमच्या कामासाठी सर्वोत्तम आहे. यात Plus प्लॅनमधील सर्व सुविधा अधिक प्रमाणात मिळतात. याशिवाय, अत्याधुनिक सुरक्षा, गोपनीयता, डेटा प्रशिक्षण (Training) साठी वापरला न जाणे, शेअरपॉईंट (Sharepoint) सारख्या संकेतस्थळांशी शेअरिंगची सुविधा, कोडिंग, व्हिडीओ, इमेज तयार करणे यासह चॅटजीपीटीच्या सर्व सुविधा यात उपलब्ध करून दिल्या आहेत.

हेही वाचा - UPI Transactions : आता युपीआय पेमेंट करणं अधिक सोपं! फिंगरप्रिंट आणि फेस आयडीच्या वापराने करा झटपट व्यवहार; जाणून घ्या स्टेप्स


सम्बन्धित सामग्री