महाराष्ट्र : राज्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या "देवगिरी" निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वतीने विशेष स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं. या स्नेहभोजनाला महायुतीतील प्रमुख नेते, मंत्री, आमदार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'देवगिरी' या शासकीय निवासस्थानी शुक्रवारी महायुतीचे मंत्री, आमदार आणि शासकीय अधिकाऱ्यांसाठी विशेष स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. या स्नेह भोजनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे तसेच शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार उपस्थित होते.
स्नेहभोजनाच्या निमित्ताने राजकीय शक्तिप्रदर्शन
शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील महत्त्वाचे नेते या स्नेहभोजनाला उपस्थित होते. राजकीय वातावरणातील तणाव कमी करण्यासाठी आणि आगामी निवडणुकांपूर्वी गटांच्या एकजुटीचा संदेश देण्यासाठी हा कार्यक्रम महत्त्वाचा मानला जात आहे.
राजकीय चर्चेसाठी साधले व्यासपीठ
स्नेहभोजनामध्ये विविध राजकीय चर्चांना उधाण आले. आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी महायुतीतील सहकार्य, धोरणात्मक निर्णय, आणि स्थानिक पातळीवरील राजकारणावर चर्चा झाली.
संवाद आणि सहकार्याचा प्रयत्न
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या स्नेहभोजनातून महायुतीतील नेत्यांमध्ये अधिक संवाद साधण्याचा प्रयत्न केला. सरकारच्या योजना, कामगिरी आणि आगामी आर्थिक वर्षातील धोरणांवरही चर्चेला वाव मिळाला.
कार्यक्रमाचा उद्देश्य
स्नेहभोजन हा केवळ राजकीय संवादाचा मंच नसून नेत्यांमधील व्यक्तिगत नातेसंबंध दृढ करण्याचाही एक प्रयत्न आहे. सरकारची एकसंघ प्रतिमा दाखवून विरोधकांना ठोस संदेश देण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचं जाणकारांनी सांगितलं.
निवडणुकांची तयारी जोरात
महायुती सरकारने आगामी निवडणुकांसाठी आतापासूनच तयारीला सुरुवात केली आहे. अशा स्नेहभोजनाच्या माध्यमातून गटबांधणीला गती देण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतंय.