Monday, December 02, 2024 12:06:27 AM

IND vs NZ
भारताची दाणादाण, फक्त ४६ धावांत आटोपला डाव

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना येथे होत आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना उशिरा सुरू झाला. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी भारताचा पहिला डाव फक्त ४६ धावांत आटोपला.

भारताची दाणादाण फक्त ४६ धावांत आटोपला डाव

बंगळुरू : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना येथे होत आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना उशिरा सुरू झाला. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी भारताचा पहिला डाव फक्त ४६ धावांत आटोपला. हा कसोटी क्रिकेटमधील तिसऱ्या क्रमांकाचा नीचांक आहे.

भारताकडून फक्त यशस्वी जयस्वाल आणि रिषभ पंत या दोघांनी वैयक्तिक दोन आकडी धावा केल्या. इतर खेळाडूंना हे जमले नाही. भारताचे विराट कोहली, सर्फराझ खान, केएल राहुल, आर. जडेजा, आर. अश्विन हे पाच खेळाडू शून्यावर बाद झाले.

भारत : ३१.२ षटकांत सर्वबाद ४६ धावा. यशस्वी जयस्वाल १३ धावा, रोहित शर्मा (कर्णधार) २ धावा, विराट कोहली शून्य धावा, सर्फराझ खान शून्य धावा, रिषभ पंत (यष्टीरक्षक फलंदाज) २० धावा, केएल राहुल शून्य धावा, आर. जडेजा शून्य धावा, आर. अश्विन शून्य धावा, कुलदीप यादव २ धावा, जसप्रीत बुमराह १ धाव, मोहम्मद सिराज नाबाद ४ धावा. अवांतर ४. न्यूझीलंड : मॅट हेन्री ५ बळी, विल्यम ओरुरके ४ बळी, टीम साउदी १ बळी


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo