महाराष्ट्र: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी अनेक आरोप प्रत्यारोप होताय. याप्रकरणी सात जणांवर मकोका लावण्यात आला असून वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावण्यात आलेला नाही. त्यातच वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे संबंध असल्याने अनेक चर्चा देखील होताय. त्यातच मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाच आता धनंजय मुंडेंची बहीण पंकजा मुंडे यांनी यावर भाष्य केलंय.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
‘धनंजय मुंडे यांच्या राजीनामा बाबत त्यांच्या पक्षाचे अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली. त्यावर मी कॉउंटर करणार नाही. त्यांचं जर म्हणणं असेल, शोध लागेपर्यंत कारवाई करणार नाही ते जर असं म्हणत आहेत. त्यावर मी रोज काय बोलू? असा सवालच त्यांनी केलाय.
त्याचबरोबर सुरेश धस यांच्याविषयी बोलताना त्या म्हणाल्यात की , ‘सुरेश धस रोज नवे नवे आरोप करत आहे. मी त्यावर काय बोलू, मी कुठं गप्प आहे. मुळात मीच सर्वात आधी या प्रकरणात एसआयटीची मागणी केली होती मी पहिली मागणी केली. माझ्या बोलण्यामुळे राज्य हलले असते तर आता जे ते बोलताय. मग ते पूर्वी का बोलले नाही. मागच्या 2 वर्षांत का बोलले नाही असं म्हणत त्यांनी थेट धसांवर प्रश्न उपस्थित केलाय.
त्याचबरोबर वाल्मिक कराडवर मकोका लावला नाही यावर देखील पंकजा मुंडेंनी भाष्य केलंय. “मकोका लावला की नाही, याबद्दल मला महिती नाही काय प्रतिक्रिया मी यावर देऊ? मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलाय तर योग्यच आहे. तपासबाबत आपण बोलणं योग्य नाही. पुण्यात काल वाईट घटना घडली, तरुणीला मारलं हे सगळीकडे घडतंय, अशा घटना राज्यात सगळीकडे घडताय. कुठलीही घटना होते भांडण अथवा खून ज्यांना राजकारण करायचे आहे त्यासाठी ही संधी आहे, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांना टोला लगावलाय.