पॅरिस : पॅरिसच्या क्रीडा महाकुंभात (पॅरिस ऑलिम्पिक २०२४) भारताने आतापर्यंत एक रौप्य आणि चार कांस्य पदके जिंकली आहेत. भालाफेकीत नीरज चोप्राने रुपेरी कामगिरी केली. भारताच्या पुरुष हॉकी संघाने कांस्य पदक जिंकले. नेमबाजीत दहा मीटर एअर पिस्तुल महिला एकेरी या प्रकारात मनू भाकरने तर दहा मीटर एअर पिस्तुल मिश्र या प्रकारात मनू भाकर आणि सरबज्योत यांनी कांस्य पदक जिंकले. तसेच नेमबाजीत पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन पुरुष या प्रकारात स्वप्नील कुसाळेने कांस्य पदक जिंकले.