मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे सोलापूरमध्ये दौऱ्यावर असताना एका हॉटेलमध्ये उतरले होते. या हॉटेलमध्ये घुसून मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली. हे आंदोलन करणाऱ्यांमध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची माणसं होती, असा आरोप मनसेच्या संदीप देशपांडेंनी केला.
हॉटेलमध्ये घुसखोरी करुन आंदोलक घोषणा देऊ लागले. यामुळे इतरांना त्रास होऊ लागल्याचे लक्षात येताच राज ठाकरे यांनी निवडक आंदोलकांची भेट घेतली. आंदोलकांशी बातचीत केली.