नगर : राशपच्या शरद पवारांनी नाव न घेता राम शिंदेंची अक्कल काढली आहे. मला कधी कधी गंमत वाटते जे लोक सत्तेत होते विधिमंडळात होते, आज सत्ता असेल अथवा नसेल मात्र ज्या भागातील जनतेने सत्ता दिली त्यांच्यासाठी काहीतरी होत नसेल तर त्यांच्यासाठी करणं हे कर्तव्य आहे मात्र विकास करणे शक्य नसेल तर तिथे अडथळे आणू नका असे पवारांनी म्हटले आहे.
पुढे पवार म्हणाले, आज या तालुक्यामध्ये काहीतरी नवीन होत असल्याने त्याला अडथळा आणायचा, त्याला स्थगिती आणायची, खरंतर उभं करण्यासाठी अक्कल लागते उभं केलेलं उध्वस्त करायला अक्कल लागत नाही म्हणत त्यांनी राम शिंदेंवर निशाणा साधला आहे.