मेष: स्वत:चा मूड फ्रेश करण्यासाठी एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हा. मागील काही दिवसांत तुम्ही जास्त पैसे खर्च केल्यामुळे आज तुम्हाला पैशांची अडचण भासण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या भावनांचा आदर करा, अन्यथा छोट्या गोष्टींवरून तणाव निर्माण होऊ शकतो.
वृषभ: अनावश्यक खर्च टाळा आणि फक्त गरजेच्या वस्तूंचीच खरेदी करा. दूर राहणारे नातेवाईक आज तुम्हाची संपर्क साधतील, त्यामुळे तुमचे मन प्रसन्न होईल. मोकळ्या वेळेत तुम्ही तुमच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. सकाळी तुम्हाला थोडा आळस जाणवू शकतो, पण बाहेर पडल्यावर दिवस फलदायी ठरेल.
मिथुन: तुमचे अथक प्रयत्न आणि कुटुंबातील सदस्यांकडून वेळेवर मिळालेला पाठिंबा तुम्हाला अपेक्षित निकाल देईल. मात्र, सातत्याने कठोर परिश्रम करत राहा. जे लोक छोटे व्यवसाय करत आहेत, आज त्यांना जवळच्या व्यक्तीकडून सल्ला मिळू शकतो, ज्यामुळे आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे.
कर्क: आजचा दिवस आनंदाने आणि उत्साहाने भरलेला असेल. तुमच्या मनासारख्या गोष्टी घडल्यामुळे आज तुम्ही समाधानी असाल. घरासाठी केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कामाच्या निमित्ताने आज तुम्हाला खास कार्यक्रमांना जाण्याची संधी मिळेल आणि यादरम्यान तुम्ही प्रभावशाली लोकांना भेटाल.
सिंह: इतरांविषयी बोलताना किंवा निर्णय घेताना इतरांच्या भावना समजून घ्या. चुकीचा निर्णय घेतल्याने तुमच्यावर मानसिक ताण येऊ शकतो. दूध संबंधीत व्यवसायात असलेल्या व्यक्तींना आज आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. तुम्हाला मदत करण्यासाठी आज तुमचे मित्र आणि नातेवाईक पुढे येतील. मद्यपान किंवा धूम्रपान करणे करणे, कारण तुमच्या आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो.
कन्या: आजचा दिवस तुमच्यासाठी शांत आणि आनंददायी ठरणार आहे. आज तुमचे मन आनंदी असेल. आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस तुम्हाला चांगला जाईल. आज तुम्हाला घरातील ज्येष्ठ व्यक्तीकडून आर्थिक मदत आणि जुन्या मित्रांकडून आधार मिळण्याची शक्यता आहे.
तूळ: दिवसाढवळ्या स्वप्न पाहण्यात वेळ वाया घालवू नका. त्याऐवजी, तुमची उर्जा एखाद्या अर्थपूर्ण गोष्टींवर खर्च करा, तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा आणि आज फक्त आवश्यक वस्तूंची खरेदी करा.
वृश्चिक: आज तुमच्यातील लहान मूल जागे होईल आणि आज तुम्ही एकदम खेळीमेळीच्या मूडमध्ये असाल. व्यवसाय मजबुत करण्यासाठी आज तुम्ही काही महत्त्वाचे पाऊल उचलू शकतात. त्यासाठी, तुमची जवळची व्यक्ती आज तुम्हाला मदत करेल.
धनु: तुमच्या आरोग्याची थोडी काळजी घ्या. मात्र स्वत:वरील विश्वास तुम्हाला प्रत्येक अडचणीतून बाहेर काढेल. एखाद्या अनपेक्षित व्यक्तीकडून आर्थिक मदत मिळाल्याने तुम्ही खुश व्हाल. कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.
मकर: आजचा दिवस विश्रांतीसाठी आणि स्वत:ला आनंद देण्यासाठी योग्य आहे. तणाव कमी करण्यासाठी आज तुम्ही मौजमजा आणि करमणूक करा. पैशांबाबत नवे विचार आणि कल्पना वापरल्यास तुम्हाला फायदा होईल.
कुंभ: आजचा दिवस मैत्री आणि नातेसंबंधांसाठी आनंददायी ठरेल. एखाद्या खास व्यक्तीशी ओळख झाल्यामुळे तुमच्या विचारांवर सकारात्मक प्रभाव पडेल. जुन्या मित्रमैत्रिणींशी भेट झाल्याने आज तुमचे मन प्रसन्न होईल. तुमची तंदुरुस्ती आज तुमच्या कुटुंबातील सदस्यांना आनंद देईल.
(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)