मेष: आज आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. मान किंवा पाठीच्या वेदनांचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे जास्त काम करणे टाळा आणि पुरेशी विश्रांती घ्या. कर्जसंबंधीत काही अचडणी निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आर्थिक बाबतीत संयम ठेवा.
वृषभ: आजचा दिवस तुमच्यासाठी आनंद आणि मौजमजेने भरलेला असेल. आज तुम्ही प्रत्येक क्षणाचा आनंद घ्याल. प्रवासामुळे आज तुम्हाला थोडा थकवा जाणवू शकतो, पण आर्थिकदृष्ट्या फायदा होण्याची शक्यता आहे. प्रेम आणि आपुलकी दाखवणाऱ्या लोकांसोबत वेळ घालवण्याने तुम्हाला आनंद मिळेल.
मिथुन: आजचा दिवस तुमच्या सर्वांगीण विकासासाठी चांगला आहे. तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे आज तुम्हाला नवीन मित्र मिळतील. प्रिय व्यक्तींना गुपित सांगणे टाळा, कारण त्यामुळे गैरसमज होण्याची शक्यता आहे.
कर्क: आज तुमच्यात प्रचंड ऊर्जा आणि उत्साह आहे, मात्र कामाचा ताण वाढल्यामुळे आज तुम्हाला थकवा जाणवेल. अपयश आल्यास खचून जाऊ नका. आजचा दिवस जरी व्यस्त असला तरी, सायंकाळी तुम्ही स्वत:साठी आणि तुमच्या कुटुंबासाठी थोडा वेळ नक्की काढा.
सिंह: व्यायाम किंवा योगासन केल्याने आज तुम्ही तंदुरुस्त आणि ऊर्जावान राहाल. व्यवसायात, विशेषत: नातेवाईक किंवा जवळच्या लोकांशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगा, अन्यथा आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. घरातील काही परिस्थिती तुमच्या मनाला अस्वस्थ करू शकतात, परंतु संयम ठेवा.
कन्या: भावनिकदृष्ट्या आजचा दिवस तुमच्यासाठी थोडासा संमिश्र असू शकतो. आज तुमची मुले तुमच्या अपेक्षेप्रमाणे वागणार नाही, त्यामुळे आज तुम्ही अस्वस्थ व्हाल. प्रवास करताना सामानाची काळजी घ्या.
तूळ: आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साही आणि सकारात्मक असेल. शारीरिक क्षमता टिकवण्यासाठी आज तुम्ही व्यायाम किंवा योगासन करा. आर्थिकदृष्ट्या काही चांगल्या संधी आज तुमच्या वाट्याला येऊ शकतात.
वृश्चिक: मानसिक तणाव आणि दडपण बाजूला ठेवून आजचा दिवस सकारात्मकतेने सुरू करा, त्यामुळे मन शांत राहील. आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस अनुकूल आहे. आज तुम्हाला अनपेक्षित धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे.
धनु: मानसिकदृष्ट्या कणखर बनण्यासाठी ध्यानधारणा आणि योगासने करा. करिअरकडे लक्ष केंद्रित करण्याऐवजी अनावश्यक गोष्टींकडे लक्ष दिल्यामुळे आज तुम्ही निराश व्हाल.
मकर: आजचा दिवस मिश्र फळ देणारा राहील. आज तुमचा आत्मविश्वास वाढेल. सायंकाळी अनपेक्षितपणे पैसे खर्च होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुम्ही चिंतीत राहाल. दुपारी चांगली बातमी मिळाल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल.
कुंभ: आजचा दिवस आशादायी राहील. पैसे वाचवण्याबाबत कुटुंबातील वरिष्ठांचा सल्ला घ्या. प्रियजनांसोबत नातेसंबंध टिकवण्यासाठी वाद टाळा. आज तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल.
मीन: आजचा दिवस तुमच्यासाठी खूप आनंददायी आणि लाभदायक ठरणार आहे. आज तुम्हाला थोडा थकवा जाणवेल. मित्रांना भेटण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे. ज्या मित्रांसोबत बऱ्याच वर्षांपासून तुमची भेट झाली नाही, त्यांना भेटण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.
(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)