Saturday, January 25, 2025 07:25:02 AM

Indian badminton player PV Sindhu Wedding
फुलराणी पीव्ही सिंधूचं लग्न या महिन्यात ...

भारताची फुलराणी म्हणून जगप्रसिद्ध असलेली बॅडमिंटन (Badminton) खेळाडू पी.व्ही. सिंधू (PV Sindhu) आता बोहल्यावर चढणार आहे.

फुलराणी पीव्ही सिंधूचं लग्न या महिन्यात  

नवी दिल्ली : भारताची फुलराणी म्हणून जगप्रसिद्ध असलेली बॅडमिंटन (Badminton) खेळाडू पी.व्ही. सिंधू (PV Sindhu) आता बोहल्यावर चढणार आहे. सिंधूने लग्न करण्याचा निर्णय घेतला असून २२ डिसेंबरला उदयपूर येथे हा शाही विवाह सोहळा धुमधामात पार पडणार आहे. 

सिंधूचे वडील पीव्ही रमण्णा (PV Ramana) यांनी सांगितले की, " आम्ही दोन्ही कुटुंब एकमेकांना बऱ्याच वर्षांपासून ओळखतो. पण सिंधूचे लग्न हे गेल्या महिन्याभराच्या कालावधीत ठरले आहे. सिंधू ही आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत असल्यामुळे तिचे वेळापत्रक व्यस्त आहे. त्यामुळे सिंधू जानेवारीपाासून व्यस्त होणार आहे. त्यामुळे डिसेंबरमध्येच लग्न करण्याच आम्ही ठरवले आहे. त्यामुळे दोन्ही कुटुंबियांनी हा लग्न सोहळा २२ डिसेंबरला व्हावा, असे ठरवले आहे. त्यानंतर २४ डिसेंबरला हैदराबाद येथे रिसेप्शनही ठेवण्यात आले आहे. पण लग्नानंतर काही दिवसांनी सिंधू आपल्या ट्रेनिंगला सुरुवात करणार आहे. "

पी.व्ही. सिंधूचा होणारे पती कोण ?

सिंधूचे लग्न हे वेकंट दत्ता साई (Venkat Datt Sai) यांच्याशी होणार आहे. वेकंट दत्ता साई हे पोसिडेक्स टेक्नॉलॉजिसमध्ये कार्यकारी संचालक पदावर कार्यरत आहेत. यापूर्वी वेंकट दत्ता साई यांचे नाव प्रकाशझोतात आले नव्हते. पण सिंधूच्या कुटुंबियांशी त्यांचे बऱ्याच वर्षांपासूनचे संबंध आहेत. त्यामुळे पीव्ही सिंधू आणि वेंकट दत्ता साई हे एकमेकांना बऱ्या वर्षांपासून ओळखत असावेत, असे म्हटले जात आहे.   

पी.व्ही. सिंधूची कारकीर्द 

भारताला ऑलिम्पिकमध्ये सलग दोन पदके जिंकवून देणारी सिंधू ही पहिली बॅडमिंटन खेळाडू ठरली आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये तिने रौप्यपदक जिंकले होते, त्यानंतर टोकिओ येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये तिने कांस्यपदकाची कमाई केली होती. त्याचबरोबर बॅडमिंडनध्ये वर्ल्ड चॅम्पियन बनणारी ती भारताची पहिलीच आणि एकमेव खेळाडू ठरलेली आहे. सिंधूच्या शिरपेचात अनेक मानाचे तुरे खोवले गेले आहेत. काही दिवसांपूर्वी सिंधूने सय्यज मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकली होती.  
 


सम्बन्धित सामग्री