Thursday, November 13, 2025 11:07:09 PM

पंतप्रधान मोदींचे पालघरमध्ये नवीन विमानतळाचं आश्वासन

नवीन विमानतळामुळे मुंबई, एमएमआर आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला महत्त्वपूर्ण प्रोत्साहन मिळणार

पंतप्रधान मोदींचे पालघरमध्ये नवीन विमानतळाचं आश्वासन
MANUNILE
MANOJTELI

मुंबई : पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराचे भूमिपूजन नुकतेच झाले. त्यावेळी, महाराष्ट्रातील या महत्वाच्या स्थानिक प्रकल्पाशी संबंधित, पालघरमध्ये नवीन विमानतळाची मागणी करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज धुळ्यात झालेल्या कार्यक्रमात या मागणीसाठी अत्यंत सुस्पष्ट आश्वासन दिले. नवीन विमानतळामुळे मुंबई, एमएमआर आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला महत्त्वपूर्ण प्रोत्साहन मिळणार आहे. हा प्रकल्प पर्यटन, व्यापार आणि इतर विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरेल. पंतप्रधान मोदी यांच्या या आश्वासनाबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे आभार ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केले. पालघरच्या वाढवण विमानतळ प्रकल्पाचा शुभारंभ राज्यातील विकासामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावेल.


सम्बन्धित सामग्री