Thursday, September 12, 2024 11:48:19 AM

Narendra Modi
'हिंदूंचे रक्षण करा' मोदींनी युनूसना सुनावले

बांगलादेशच्या काळजीवाहू सरकारचे नेतृत्व डॉ. महंमद युनूस करत आहेत. त्यांचा शपथविधी झाल्यानंतर मोदींनी शुभेच्छा देतानाच युनूस यांना सुनावले.

हिंदूंचे रक्षण करा मोदींनी युनूसना सुनावले

नवी दिल्ली : बांगलादेशच्या काळजीवाहू सरकारचे नेतृत्व डॉ. महंमद युनूस करत आहेत. त्यांचा शपथविधी झाल्यानंतर शिष्टाचार म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक एक्स पोस्ट केली. या पोस्टद्वारे पंतप्रधान मोदींनी नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा देतानाच युनूस यांना सुनावले. 

'प्राध्यापक महंमद युनूस यांना नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा. 'बांगलादेशमध्ये स्थैर्य निर्माण होईल तसेच  हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांचे संरक्षण होईल, अशी आशा करतो;' या शब्दात मोदींनी युनूस यांना सुनावले. 

नोबेल विजेते, ग्रामीण बँकेचे संस्थापक आणि अमेरिकेचे विश्वासू म्हणून युनूस यांना ओळखले जातात. शपथ घेण्यासाठी ते पॅरिस येथून बांगलादेशची राजधानी ढाका येथे पोहोचले. बांगलादेशचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी युनूस यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. 

याआधी आरक्षणाच्या मुद्यावर बांगलादेशमध्ये दंगल झाली. कायदा सुव्यवस्था बिघडली. शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आणि देश सोडला. सध्या शेख हसीना भारतात सुरक्षित ठिकाणी आहेत. बांगलादेशात दंगलीत ४५० पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला. कोट्यवधी रुपयांची वित्तहानी झाली.


सम्बन्धित सामग्री