ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ५ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्याचा दौरा करणार आहेत. मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी ठाणे शहरातील कासारवडवली येथे जाणार आहेत. या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे.
राज्यात लवकरच विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. यामुळे पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचे महत्त्व वाढले आहे. या दौऱ्यामुळे ठाणे शहर पोलिसांनी वाहतूक मार्गांमध्ये बदल केले आहेत. नेत्यांच्या वाहनांचा ताफा वावरणार असल्यामुळे इतर वाहनांची वाहतूक वळवण्याचा निर्णय झाला आहे. या निर्बंधांची माहिती ठाणे शहर पोलिसांच्या अधिकृत एक्स हँडल अर्थात ट्विटर हँडलवर देण्यात आली आहे.
