Monday, December 02, 2024 12:04:44 AM

Pune
पुण्यात महापालिकेचा ट्रक खड्ड्यात

सांडपाणी वाहिनीच्या दुरूस्तीसाठी आलेला ट्रक रस्ता खचल्यामुळे क्षणार्धात सुमारे २५ फूट खोल खड्ड्यात पडला.

पुण्यात महापालिकेचा ट्रक खड्ड्यात

पुणे : सांडपाणी वाहिनीच्या दुरूस्तीसाठी आलेला ट्रक रस्ता खचल्यामुळे क्षणार्धात सुमारे २५ फूट खोल खड्ड्यात पडला. चालक प्रसंगावधान राखून वेगाने टॅकमधून बाहेर पडल्यामुळे सुखरुप आहे. या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही. घटनेचे सीसीटीव्ही फूटेज व्हायरल होत आहे. प्रशासनाने क्रेनच्या मदतीने खड्ड्यातून ट्रक बाहेर काढला आहे. या निमित्ताने रस्त्याच्या दर्जाबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. दुर्घटनेची चौकशी होणार आहे. 


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo