Thursday, March 20, 2025 03:41:02 AM

Police Sub-Inspector Dies by Suicide: धक्कादायक! लोणावळ्यात पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या

लोणावळ्यातील एका पोलीस उपनिरीक्षकाने आत्महत्या केल्याचं उघडकीस आलं आहे. अण्णा गुंजाळ असं या पोलिस अधिकाऱ्याचं नाव आहे.

police sub-inspector dies by suicide धक्कादायक लोणावळ्यात पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या
Suicide प्रतिकात्मक प्रतिमा
Edited Image

Police Sub-Inspector Dies by Suicide: पुणे जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. लोणावळ्यातील एका पोलीस उपनिरीक्षकाने आत्महत्या केल्याचं उघडकीस आलं आहे. अण्णा गुंजाळ असं या पोलिस अधिकाऱ्याचं नाव आहे. अण्णा गुंजाळ यांचा मृतदेह  लोणावळ्यातील आढळला. गुंजाळ हे खडकी पोलीस ठाण्यात तैनात होते.

हेही वाचा - अरे देवा!!! CIBIL स्कोअर कमी भरल्याने मोडलं लग्न! अकोल्यातील घटना

प्राप्त माहितीनुसार, गुंजाळ गेल्या तीन ते चार दिवसांपासून बेपत्ता होते. त्यांच्याशी फोनवरूनही संपर्क होत नव्हता. ज्यादिवशी अण्णा गुंजाळ यांचा यांनी आत्महत्या केल्याचं समजलं, त्या दिवशी त्यांचे कुटुंबिय खडकी पोलीस ठाण्यात त्यांची बेपत्ता होण्यासंदर्भातील तक्रार दाखल करणार होते. मात्र, ही तक्रार दाखल करण्यापूर्वीचं अण्णा गुंजाळ लोणावळ्यातील टायगर पॉइंट येथे लटकलेल्या अवस्थेत आढळले. 

हेही वाचा -हृदयद्रावक! मुलाला शाळेत सोडले; एका तासाने मुलगा गेल्याचा फोन

अण्णा गुंजाळ यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सध्या त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. तथापी, लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अण्णा गुंजाळ यांच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज शिरीष मोरे यांची आत्महत्त्या -

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पुण्यात संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उपदेशक शिरीष मोरे महाराज यांनी आत्महत्या केली होती. 30 वर्षीय शिरीष महाराज यांनी त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. 
 


सम्बन्धित सामग्री