सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार अधिक चर्चेत आहेत. यांच्या शिक्षणावरून सध्या टिकेची झोड उठवत ट्विटरवर पोस्ट केल्यानंतर अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी भावनिक पोस्ट करत प्रत्युत्तर दिलं आहे. मात्र यावरच अंजली दमानिया यांनी रिप्लाय दिला आहे.
काय म्हणाल्या होत्या रुपाली चाकणकर?
"आदरणीय अजित दादा पवार यांच्या वडिलांचे हृदय विकाराने दुःखद निधन झाले. त्या वेळी अजितदादा कोल्हापूर येथे शिक्षण घेत होते.वडिलांच्या निधनानंतर दादांनी शिक्षण अर्ध्यात सोडले.त्यामुळे कोणीही अजितदादा यांच्यावर या मुद्द्यावरून टीका टिप्पणी करावी असा हा विषय नसून ही त्यांच्या जीवनातील अतिशय संवेदनशील घटना आहे. शिक्षण सोडून बारामतीमध्ये आल्यावर दादांनी शेती करायला सुरूवात केली, पोल्ट्री व्यवसाय वाढवला, वेगवेगळी पिके घेतली. मग त्यांनी राजकारणाचा मार्ग निवडला.
हेही वाचा - Ambadas Danve : 'कटप्रमुखां'च्या योजना 'चालू सरकार'नं केल्या बंद; शिंदे-फडणवीसांना अंबादास दानवेंचा टोला
गणितात अतिशय हुशार आणि इमारती, रस्ते, पूल आदींच्या बद्दल इंजिनियरला लाजवेल असा अभ्यास असणारे अजितदादा आहेत. त्यांचा दृष्टिकोन हा काळाच्या पुढे बघण्याचा कायम राहिलेला आहे. शिक्षण आणि कृषी क्षेत्रात एआय वापरण्यासाठी आग्रही असणारे अजितदादा पवार आहेत. त्यांना भविष्याचा अचूक वेध घेता येतो तो त्यांच्या अभ्यासू आणि चौकस दृष्टीकोनामुळेच..".
हेही वाचा - Ramdas Athawale : 'टूटे रिश्तों को जोड़ने चला...'; बाबासाहेबांचं नाव पुढे करत प्रकाश आंबेडकरांना एकत्र येण्यासाठी रामदास आठवलेंनी घातली साद
यावर अंजली दमानिया यांनीदेखील पोस्ट शेअर केली आहे. त्या म्हणाल्या की, "मग अजित पवारांनी कृषी मंत्री जरूर व्हावे. अर्थ मंत्रालय, हा खूप महत्वाचा आणि अतिशय गंभीर आहे. यातील सगळ्या बाबी समजण्यासाठी अर्थशास्त्राचा अभ्यास / ज्ञान असणे आवश्यक आहे. स्वित्झर्लंड हा देश 41258 चौकिमी आहे आणि महाराष्ट्र 307713 चौकिमी आहे. म्हणजे आपले महाराष्ट्र राज्य हे स्वित्झर्लंड या देशाच्या तुलनेत 8 पट मोठे आहे.
स्वित्झर्लंड ची GDP 83,33,000 कोटी आहे आणि महाराष्ट्राची 42,67,000 कोटी आहे, म्हणजे अर्ध्याने. महाराष्ट्रावर कर्ज आता 9,32,000 कोटी आहे. ते कसे कमी होणार ? काही ब्लू प्रिंट आहे का?"
त्याचबरोबर आता चाकणकर आणि दमानिया यांच्यात सोशल मिडिया वॉर बघायला मिळत आहे.