Saturday, November 08, 2025 07:10:55 AM

'आचारसंहितेनंतर भूमिका सांगू'

पोलीस बंदोबस्तात बोलत असलेल्या मनोज जरांगेंनी बीडमध्ये दसऱ्यानिमित्त घेतलेल्या सभेवेळी राज्य शासनाला इशारावजा धमकी दिली.

आचारसंहितेनंतर भूमिका सांगू

बीड : मराठ्यांना ओबीसींमधून सरससकट आरक्षण देण्याची मागणी करणाऱ्या करणाऱ्या मनोज जरांगे यांनी आता नवी भूमिका घेतली आहे. मागण्या आचारसंहितेपूर्वी मान्य करुन अमलात आणा. नाहीतर आचारसंहिता लागू झाल्यावर भूमिका जाहीर करू; या शब्दात मनोज जरांगेंनी राज्य शासनाला इशारावजा धमकी दिली आहे. मागण्या मान्य होणार नसतील तर उलथापालथ करावी लागेल, असा इशाराही मनोज जरांगे यांनी राज्य शासनाला दिला आहे. पोलीस बंदोबस्तात बोलत असलेल्या मनोज जरांगेंनी बीडमध्ये दसऱ्यानिमित्त घेतलेल्या सभेवेळी राज्य शासनाला इशारावजा धमकी दिली.

'मनोज जरांगेंचं ठरेना'
आचारसंहितेनंतर जरांगे भूमिका मांडणार
बीडच्या महामेळाव्यात केली घोषणा


सम्बन्धित सामग्री