Tuesday, December 10, 2024 11:29:38 AM

Baba Siddique Case
बाबा सिद्दिकी प्रकरणात प्रवीण लोणकरला पोलीस कोठडी

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी प्रवीण लोणकरला २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी झाली आहे. पोलीस प्रवीणचा भाऊ शुभम याचा शोध घेत आहेत.

बाबा सिद्दिकी प्रकरणात प्रवीण लोणकरला पोलीस कोठडी

मुंबई : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी प्रवीण लोणकरला २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी झाली आहे. पोलीस प्रवीणचा भाऊ शुभम याचा शोध घेत आहेत. 

मुंबईत निर्मलनगर येथे शनिवारी १२ ऑक्टोबर २०२४ रोजी बाबा सिद्दिकी यांची हत्या झाली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असताना शुभमने केलेली फेसबुक पोस्ट व्हायरल झाली. या पोस्टमध्ये त्याने बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचे कारण नमूद केले होते. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी शुभमचा शोध सुरू केला. शोध सुरू होताच शुभम फरार झाल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. यानंतर चौकशीसाठी पोलिसांनी शुभमच्या भावाला प्रवीण लोणकरला ताब्यात घेतले. प्रवीणची चौकशी केल्यावर पोलिसांनी बाबा सिद्दिकी यांच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप ठेवत त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने प्रवीणला पोलीस कोठडी दिली.

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण

  1. आरोपी गुरमेल बलजीत सिंह - हरियाणा - हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप - २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी
  2. आरोपी धर्मराज राजेश कश्यप - उत्तर प्रदेश - हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप - आरोपीने अल्पवयीन असल्याचा दावा केला - वैद्यकीय तपासणी झाली, निष्कर्ष न्यायालयात सादर झाल्यानंतर पुढील कारवाई होणार
  3. आरोपी प्रवीण लोणकर - महाराष्ट्र - हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप - २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी
  4. आरोपी शुभम लोणकर - महाराष्ट्र - हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप - आरोपी फरार, पोलीस शोधत आहेत
  5. आणखी एका आरोपीला पोलीस शोधत आहेत. या आरोपीचे नाव शिवकुमार गौतम असल्याचे वृत्त आहे. हा आरोपी फरार आहे.


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo