पुणे : बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात संशयित असलेल्या वाल्मिक कराड संबंधित खुलासे बाहेर येत आहेत. आताही पुण्यात वाल्मिक कराडची प्रॉपर्टी असल्याचे समोर आले आहे. पण ती कराडच्या पत्नीच्या नावे आहे. पुण्यात वाल्मिक कराडच्या पत्नीच्या नावे दोन प्लॉट्स आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधव यांच्या नावाने प्लॉट असल्याची अधिकृत कागदपत्रे जय महाराष्ट्रच्या हाती लागली आहेत. पुण्यातील फर्ग्यूसन महाविद्यालयासमोर वाल्मिक कराडने प्रॉपर्टी खरेदी केली आहे. ज्योती जाधव यांच्या नावे सहाव्या मजल्यावर क्रमांक 610 सी ऑफिस खरेदी केले आहे. तसेच सहाव्या मजल्यावरच 611 बी हे आणखी एक ऑफिसही ज्योती जाधव यांच्या नावे खरेदी केले आहे.
हेही वाचा : बीड मस्साजोग गावातून मोठी बातमी; काय म्हणाले धनंजय देशमुख ?
काही दिवसांपूर्वी ज्योती जाधव यांची देखील चौकशी करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर प्रॉपर्टी ताब्यात घेण्याची सुरेश धस यांच्याकडून मागणी करण्यात आली होती.