Tuesday, November 11, 2025 01:01:34 AM

दंडवाढीचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे

फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना भविष्यात जास्तीचा दंड भरावा लागण्याची शक्यता आहे.

दंडवाढीचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे

मुंबई :  फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना भविष्यात जास्तीचा दंड भरावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे फुकट्या प्रवाशांवर येणाऱ्या काळात आळा बसण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने तिकीट नसलेले आणि अनधिकृत प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर आकारल्या जाणाऱ्या दंडाच्या रकमेमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक (कार्य) बी. अरुण कुमार यांनी ९ सप्टेंबरला मध्य रेल्वेच्या मुख्य व्यावसायिक व्यवस्थापक (प्रवासी सेवा) यांना पत्र लिहून रेल्वे बोर्डाकडे दंडवाढीची मागणी केली आहे. सुमारे २० वर्षांपूर्वी दंडाची शेवटची सुधारणा करण्यात आली होती.


सम्बन्धित सामग्री