Monday, February 10, 2025 06:18:30 PM

Pune IT Worker Murder NEWS
पुण्यात मित्राने मैत्रिणीवर केला धारदार चाकूने हल्ला

पुण्यातील एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या दोन सहकाऱ्यांमध्ये आर्थिक वादामुळे धारदार हत्याराने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात शुभदा शंकर कोदारे (२८) हिचा मृत्यू झाला आहे.

पुण्यात मित्राने मैत्रिणीवर केला धारदार चाकूने हल्ला

पुणे : पुण्यातील एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या दोन सहकाऱ्यांमध्ये आर्थिक वादामुळे धारदार हत्याराने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात शुभदा शंकर कोदारे (२८) हिचा मृत्यू झाला आहे.

घटनेची माहिती अशी की, पुण्याच्या येरवडा भागातील WNS कंपनीच्या पार्किंगमध्ये ७ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला. शुभदा कोदारे आणि कृष्णा कनोजा (३०) हे दोघेही आयटी कंपनीत अकाउंटंट म्हणून काम करत होते. कृष्णाने काही पैसे शुभदा कोदारेला दिले होते, मात्र ती ती पैसे परत देण्यात टाळाटाळ करत होती. यावरून दोघांमध्ये वाद झाला होता.

क्लिक करा. -  जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

विवादाचे रूपांतर हल्ल्यात झाले, जेव्हा कृष्णाने धारदार हत्याराने शुभदाच्या उजव्या कोपरावर वार करून तिला गंभीर जखमी केले. जखमी झालेल्या शुभदाला सह्याद्री हॉस्पिटल, येरवडा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. येरवडा पोलिसांनी आरोपी कृष्णा कनोजाला अटक केली आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

हल्ला प्रकरणाची सविस्तर माहिती:
घटना तारीख: ७ जानेवारी २०२५
स्थळ: WNS कंपनी पार्किंग, रामवाडी, येरवडा
मृतक: शुभदा शंकर कोदारे, २८ वर्षे
आरोपी: कृष्णा सत्यनारायण कनोजा, ३० वर्षे
वार: धारदार हत्याराने हल्ला
मृत्यू: उपचारादरम्यान मृत्यू
पोलिस तपास: आरोपी ताब्यात, पुढील तपास सुरू, पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी दिली माहिती.

👉👉 हे देखील वाचा : मुख्यमंत्री फडणवीस यांचा अधिकाऱ्यांसाठी सात कलमी कृती कार्यक्रम काय आहे ?


सम्बन्धित सामग्री