Friday, March 13, 2026 10:13:20 PM

Pune Mayor Manjusha Nagpure : मंजुषा नागपुरेंनी घेतली महापौरपदाची सूत्रे हाती; पुष्पगुच्छ स्वीकारण्यास हात जोडत विनम्र नकार

पुणे महापालिकेच्या महापौरपदी मंजुषा नागपुरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. महापौर नागपुरे या त्यांच्या साधेपणासाठी ओळखल्या जातात.

pune mayor manjusha nagpure  मंजुषा नागपुरेंनी घेतली महापौरपदाची सूत्रे हाती पुष्पगुच्छ स्वीकारण्यास हात जोडत विनम्र नकार

Pune News: पुणे महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर मंजुषा नागपुरे यांनी आपल्या पदाची सूत्रे हाती घेताच प्रशासकीय शिस्तीचा आणि साधेपणाचा एक नवा आदर्श घालून दिला आहे. सोमवारी, 9 फेब्रुवारी 2026 रोजी त्यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत करण्यासाठी फुलांचे मोठे पुष्पगुच्छ आणले होते. मात्र, हे पुष्पगुच्छ स्वीकारण्यास महापौरांनी नम्रपणे नकार दिला. अधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ पुढे करताच महापौर नागपुरे यांनी दोन्ही हात जोडून त्यांचे अभिवादन स्वीकारले.

पुणे महापालिकेच्या 58 व्या महापौरपदी मंजुषा नागपुरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपमहापौर परशुराम वाडेकर यांचीही बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र, अर्ज माघारी घेण्याची विनंती भाजपकडून या दोन्ही पक्षांच्या नेत्यांना करण्यात आली होती. अखेर या दोन्ही पक्षांनी माघार घेतल्याने ही निवड बिनविरोध झाल्याचे पीठासन अधिकारी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी जाहीर केले.

हेही वाचा - Pune Mayor : पुण्याचा कारभारी ठरला! भाजपच्या मंजुषा नागपुरे बिनविरोध महापौर, तर उपमहापौरपदी परशुराम वाडेकर

विशेष म्हणजे नागपुरे या महापालिकेच्या निवडणुकीत बिनविरोध म्हणून निवडून आलेल्या पहिला महिला नगरसेविका असून प्रभाग 35 मधून त्या निवडून आल्या आहेत. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यासह सर्व अधिकारी, नवनिर्वाचित नगरसेवक यावेळी उपस्थित होते. यावेळी भाजपकडून आधी जाहीर केल्यानुसार कोणताही जल्लोष करण्यात आला नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांचे अचानकपणे निधन झाल्यामुळे कोणत्याही प्रकारचा झगमगाट किंवा मोठे सेलिब्रेशन करण्यात येणार नाही, असे भाजपकडून आधीच सांगण्यात आले होते.

स्वच्छ आणि सुंदर पुण्याचे ध्येय
महापौर नागपुरे या केवळ साधेपणासाठीच नाही, तर त्यांच्या दूरदृष्टीसाठीही ओळखल्या जातात. त्यांनी आपल्या भाषणात 'स्वच्छ प्रभाग, सुंदर प्रभाग' या संकल्पनेवर भर दिला आहे. शहरात कचऱ्याचे ढीग साचू नयेत यासाठी त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी प्रशासनाला कडक सूचना दिल्या आहेत. विशेषतः सिंहगड रोड भागातील पूर परिस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी संरक्षक भिंत आणि 'फ्लड अलर्ट सिस्टिम' उभारणे ही त्यांची प्राथमिकता असणार आहे. उपमहापौर परशुराम वाडेकर यांनीही महापौरांच्या या शिस्तीचे स्वागत केले असून, पुणे महानगरपालिकेत आता कामाचा नवा अध्याय सुरू झाला आहे.

हेही वाचा - PCMC Mayor : पिंपरी चिंचवड महापौरपदी रवी लांडगे यांची बिनविरोध निवड; तर उपमहापौर पदी शर्मिला बाबर यांची वर्णी


सम्बन्धित सामग्री