पुणे : पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या मित्रांचे रक्ताचे नमुने बदलले गेल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणात आरोपी आदित्य सूद आणि आशिष मित्तल या दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. पुरावे नष्ट करणे, सरकारी दस्तऐवजात फेरफार करणे, न्यायालयीन प्रक्रियेत बेकायदा हस्तक्षेप, आरोपीच्या सुटकेसाठी बेकायदा आर्थिक व्यवहार करणे अशा स्वरुपाचे गंभीर आरोप आरोपींवर आहेत.