Wednesday, December 11, 2024 08:44:59 PM

Pune
पुणे अपघात, सहा आरोपींना न्यायालयीन कोठडी

पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणात न्यायालयाने विशाल अगरवाल आणि इतर पाच आरोपींना न्यायालयीन कोठडी दिली.

पुणे अपघात सहा आरोपींना न्यायालयीन कोठडी

पुणे : पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणात न्यायालयाने विशाल अगरवाल आणि इतर पाच आरोपींना न्यायालयीन कोठडी दिली. न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर प्रल्हाद भुतडा, सचिन काटकर, संदीप सांगळे, नितेश शेवाणी आणि जयेश बोणकर या पाच आरोपींनी जामीन मिळावा म्हणून न्यायालयात अर्ज केला आहे. विशाल अगरवालने शुक्रवारी न्यायालयीन कामकाज संपेपर्यंत जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला नव्हता.

आरोपी - वेदांत अगरवाल - वय १७ वर्षे ८ महिने - जामीन रद्द, ५ जूनपर्यंत बालसुधारगृहात रवानगी
आरोपी - विशाल अगरवाल, वेदांतचे वडील - १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
आरोपी - कोझी हॉटेलचा मालक प्रल्हाद भुतडा - १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
आरोपी - कोझी हॉटेलचा व्यवस्थापक सचिन काटकर - १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
आरोपी - ब्लॅक बारचा मालक संदीप सांगळे - १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
आरोपी - कर्मचारी नितेश शेवाणी - १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
आरोपी - कर्मचारी जयेश बोणकर - १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo