मुंबई : दिल्लीत महायुतीची गुरूवारी बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ वाटपाविषयी चर्चा झाली. या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांची खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीमध्ये शिंदे शिवसेनेच्या खासदारांसोबत बैठक झाली.
दिल्लीत महायुतीची गुरूवारी रात्री उशिरा बैठक झाली. या बैठकीत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते. या बैठकीला भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा (जे.पी.नड्डा), सुनिल तटकरे आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. अमित शाह यांनी महायुतीत भाजपाला बहुमत असल्यामुळे मुख्यमंत्री पद त्यांना मिळेल असे सांगितले. त्याचबरोबर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला उपमुख्यमंत्री पद मिळेल यावर शाह यांनी शिक्कामोर्तब केले. एकनाथ शिंदेंना नगरविकास खात, अजित पवार यांना अर्थ खात आणि देवेंद्र फडणवीसांकडे गृह खात राहणार असल्याचे निश्चित झाले. यासोबत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक-एक केंद्रीय मंत्रिपद देण्याचेही शक्यता आहे.
दिल्लीतील महायुतीच्या बैठकीनंतर शिंदे शिवसेनेच्या खासदारांची बैठक घेतली. या बैठकीत शिवसेनेच्या कोणत्या खासदारांना मंत्रिपद मिळेल यावर चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे देखील खासदार आहेत. त्यामुळे शिंदे कोणाला केंद्रीय मंत्री पद देतील या राजकीय चर्चांणा उधाण आले. श्रीकांत शिंदे की शिवसेनेतील दुसऱ्या एखाद्या खासदाराला मंत्रीपद द्यायाचे हा एकनाथ शिंदेसमोर यक्षप्रश्न उभा ठाकला आहे.
शिवसेना पक्ष प्रमुख शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधानांनी घेतलेला निर्णय मान्य असल्याचे सांगितले. त्यानंतरच भाजपाचा मुख्यमंत्री असेल हे चित्र स्पष्ट झाले होते. शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडल्यामुळे त्यांना केंद्रीय मंत्रीपद दिले जाणार आहे का? असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडला आहे.