नागपूर : काँग्रेसच्या प्रियांका गांधी यांच्या रोड शो दरम्यान राडा झाला. रोड शो दरम्यान भाजपा कार्यकर्त्यांनी झेंडे मिरवले. काँग्रेसचा हिंदूविरोधी प्रचार सुरू असल्याचे सांगत घोषणाबाजी सुरू केली. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू करताच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही घोषणाबाजी सुरू केली. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आमनेसामने आले आणि राडा झाला. पोलिसांनी हस्तक्षेप करुन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. नागपूरच्या बडकत चौक परिसरात ही घटना घडली.