Wednesday, December 11, 2024 12:51:49 PM

Rahul Gandhi
राहुल गांधींची चिखलीतली सभा रद्द

राहुल गांधींची बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीतील प्रचारसभा रद्द झाली आहे

राहुल गांधींची चिखलीतली सभा रद्द

चिखली : राहुल गांधींची बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीतील प्रचारसभा रद्द झाली आहे. विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे राहुल गांधींचे नियोजीत उड्डाण रद्द झाले. यामुळे राहुल गांधींनी बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीतील प्रचारसभेला जाणे टाळले. राहुल बुलढाणा जिह्यातील चिखली येथे महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल बोंद्रे आणि खामगावचे उमेदवार राणा दिलीप सानंदा यांच्यासाठी प्रचार करणार होते. 

चिखलीतली सभा रद्द झाली तरी राहुल यांची गोंदिया जिल्ह्यातील प्रचारसभा होणार आहे. या सभेच्या कार्यक्रमात अद्याप कोणताही बदल झालेला नाही. गोंदिया येथे गोपालदास अग्रवाल यांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत.

चिखलीतली सभा रद्द केल्यानंतर तिथल्या समर्थकांना आणि शेतकऱ्यांना उद्देशून राहुल यांनी एक संदेश प्रसिद्ध केला. सभेच्या निमित्ताने संवाद साधणार होतो. शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेणार होतो. पण आता सभा रद्द करावी लागत असल्याचे राहुल यांनी सांगितले. 


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo