मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार सुरू झाला आहे. काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी प्रचाराकरिता दिवाळीनंतर मुंबईत येणार आहे. ते ६ नोव्हेंबर रोजी मुंबईत येतील. राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेस प्रचाराचा शुभारंभ करणार आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन राहुल यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे वृत्त आहे.
महाविकास आघाडीत काँग्रेसने सर्वाधिक १०० पेक्षा जास्त उमेदवार निवडणुकीसाठी उभे केले आहेत. ठाकरेंच्या सेनेने आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने १०० पेक्षा कमी उमेदवार उभे केले आहेत. यामुळे राहुल यांच्या उपस्थितीत काँग्रेस कोणत्या मुद्यांना मांडत प्रचाराचा नारळ फोडणार याविषयी उत्सुकता वाढू लागली आहे.