Friday, December 13, 2024 12:21:22 PM

Megablock
रविवारी रेल्वेचा मेगाब्लॉक

रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर रविवार ७ जुलै रोजी मेगाब्लॉक आहे. यामुळे काही गाड्या उशिराने धावतील तर काही गाड्या रद्द केल्या जातील.

रविवारी रेल्वेचा मेगाब्लॉक

मुंबई : रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर रविवार ७ जुलै रोजी मेगाब्लॉक आहे. यामुळे काही गाड्या उशिराने धावतील तर काही गाड्या रद्द केल्या जातील. मध्य रेल्वेने रविवारी ठाणे ते दिवा आणि कुर्ला ते वाशीदरम्यान ब्लॉक जाहीर केला आहे. पश्चिम रेल्वेने वसई रोड ते विरारदरम्यान शनिवारी मध्यरात्रीनंतर ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर ब्लॉक नाही.

मध्य रेल्वे
स्थानक - ठाणे ते दिवा
मार्ग - पाचवा आणि सहावा
वेळ - सकाळी १०.५० ते दुपारी ३.२०
परिणाम - ब्लॉक वेळेत जलद मार्गावरील गाड्या धीम्या मार्गावर वळवण्यात येणार. काही गाड्या उशिराने धावतील तर काही गाड्या रद्द केल्या जातील. तसेच १८ अप-डाउन मेल-एक्स्प्रेस उशिराने धावतील.

हार्बर रेल्वे
स्थानक - कुर्ला ते वाशी
मार्ग- अप आणि डाऊन
वेळ - सकाळी ११.१० ते दुपारी ४.१०
परिणाम - सीएसएमटी ते पनवेल/बेलापूर/वाशीदरम्यान अप आणि डाऊन गाड्या बंद राहणार. सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशीदरम्यान विशेष गाड्या धावणार.

पश्चिम रेल्वे
स्थानक - वसई रोड ते विरार
मार्ग - अप आणि डाऊन धीमा
वेळ - शनिवारी मध्यरात्रीनंतर १२.१५ ते रविवारी पहाटे ४.१५
परिणाम - ब्लॉक वेळेत रात्री उशिरा धावणाऱ्या गाड्या रद्द केल्या जातील. धीम्या मार्गावरील काही गाड्या जलद मार्गावरुन धावतील. 

आषाढी यात्रेसाठी विशेष गाड्या

मध्य रेल्वेने आषाढी यात्रेसाठी ६४ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेकडून या गाड्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo