गोंदिया : मनसे अध्यक्ष राज ठाकरे गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. जिल्ह्याच्या दौऱ्यावरून आल्यानंतर मनसैनिकांनी पंधरा मिनिटे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आगामी विधानसभा निवडणूकीत पक्षपाणी मजबूत करण्याचे निर्देश राज यांनी कार्यकर्त्यांना दिले. जोपर्यंत पक्ष बांधणी मजबूत होणार नाही तोपर्यंत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह येणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. कार्यकर्त्यांना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याचे निर्देश देऊन पंधरा मिनिटात त्यांना सभा आटोपली आणि पुढील सभेसाठी निघून गेले.