Ranbir Kapoor on Relation with Daughter Raha : रणबीर कपूर आणि त्याची लाडकी लेक राहा यांच्यातील बाँडिंग नेहमीच चर्चेचा विषय ठरते. नुकत्याच एका कार्यक्रमात रणबीरने आपल्या बालपणातील आठवणींना उजाळा देत, राहाच्या संगोपनाबद्दल एक अतिशय भावनिक आणि महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे.
वडिलांशी असलेल्या नात्यातील 'ती' पोकळी
मुंबईतील एका ज्वेलरी ब्रँडच्या कार्यक्रमात रणबीर कपूरने हजेरी लावली होती. यावेळी त्याने आपले वडील, दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्यासोबतच्या नात्यावर मनमोकळेपणाने भाष्य केले. रणबीर म्हणाला, "माझे वडील आणि माझ्यात नेहमीच एक अंतर असायचे. आमच्यात कधीच मैत्रीपूर्ण नाते नव्हते. ती पिढीच तशी होती, जिथे वडिलांचा दरारा आणि धाक जास्त असायचा." ऋषी कपूर यांच्या कडक स्वभावामुळे रणबीर त्यांच्यापासून नेहमी थोडा दूरच असायचा, ही खंत त्याने बोलून दाखवली.
राहासाठी बदलणार स्वतःला
रणबीर आता एका मुलीचा बाप आहे आणि आपल्या लेकीच्या बाबतीत तो जुन्या परंपरा मोडण्यास तयार आहे. यावर भाष्य करताना तो म्हणाला, "मला माझ्या मुलांसोबतची ती जुनी 'भिंत' तोडायची आहे. मला राहाचा बाप म्हणून नाही, तर तिचा एक चांगला मित्र म्हणून राहायचे आहे." मुलांना स्वातंत्र्य देण्याविषयी तो म्हणाला, "तिला जे हवंय ते करण्याची तिला पूर्ण मुभा असेल. मला तिच्या पंखांना बळ द्यायचे आहे." सध्या सुरक्षेच्या कारणास्तव राहाचा चेहरा माध्यमांपासून लपवला जात असला तरी, रणबीर पिता म्हणून तिच्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर खंबीरपणे उभा आहे.
हेही वाचा - Subedaar Teaser: 'सुबेदार' चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीज; पाहा वयाच्या 69 व्या वर्षी अनिल कपूर यांचा दमदार अॅक्शन अवतार
घराणेशाही आणि जबाबदारीची जाणीव
कपूर कुटुंबाचा वारसा पुढे नेण्याबाबत विचारले असता रणबीरने अतिशय प्रगल्भ उत्तर दिले. "मला कपूर कुटुंबाचा वारस असल्याचा कधीच दबाव जाणवला नाही. उलट, मला ही संधी वारशाने सहज मिळाली, याची मला जाणीव आहे. देशात लाखो टॅलेंटेड कलाकार संधीची वाट पाहत असताना मला हे व्यासपीठ मिळाले आहे, त्यामुळे मी या गोष्टीला गृहीत धरू शकत नाही. मला स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणि ओरिजिनल राहण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल," असे त्याने स्पष्ट केले.
'ती' जणू आजोबांची सावलीच आणि चाहत्यांची उत्सुकता
रणबीर आणि आलियाची लेक राहा आता 3 वर्षांची झाली आहे. राहा जेव्हा पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर आली होती, तेव्हा तिच्या निळ्या डोळ्यांनी आणि गोड चेहऱ्याने सर्वांना भुरळ घातली होती. अनेकांनी तिची तुलना तिचे आजोबा ऋषी कपूर यांच्याशी केली होती. सध्या पापाराझींपासून तिला लांब ठेवले जात असल्याने चाहत्यांची थोडी निराशा होत असली, तरी रणबीरने व्यक्त केलेले विचार एका आदर्श वडिलांची प्रतिमा योग्यपणे लोकांसमोर मांडणारे आहेत.
हेही वाचा - Ranveer Singh Threat : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगला जीवे मारण्याची धमकी; व्हॉट्सअॅप मेसेजद्वारे केली कोट्यवधींची मागणी