जालना : भाजपा नेते रावसाहेब दानवे यांच्या एका कृतीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओत रावसाहेब दानवे एका कार्यकर्त्याला लाथ मारत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ बघून अनेकांनी दानवेंवर टीका करायला सुरुवात केली आहे.
शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या सहकार्याने रावसाहेब दानवेंनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमावेळी दानवे खोतकरांचा सत्कार करत होते. हा सत्कार समारंभ सुरू असताना फोटोग्राफर फोटो काढत होते. फोटो काढत असताना जवळ उभ्या असलेल्या एका कार्यकर्त्याला दानवेंनी लाथ मारुन दूर जाण्याचा इशारा दिला. या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमात व्हायरल होत आहे.