6 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
6 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
छत्रपती संभाजीनगर : येथील न्यायालयाने 6 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा सुनावली आहे. तुकाराम जाधव, या आरोपीच्या वाईट कृत्यामुळे चिमुरडीला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला, त्या नराधमाला 20 वर्षांचा सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
सदरील अत्याचाराची घटना 28 डिसेंबर 2021 रोजी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून दाखल करण्यात आली होती. पीडितेच्या आईने आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला, आणि त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपी तुकाराम जाधव याला ताब्यात घेण्यात आले आणि त्यानुसार पुरावे संग्रहित करून त्यास न्यायालयात हजर करण्यात आले.
तसेच न्यायालयाने गंभीरतेने विचार करत आरोपीला त्याच्या कृत्याचा पुरावा देत कायदेशीर ठोस निर्णय दिला. ही शिक्षा फक्त आरोपीसाठीच नाही तर संपूर्ण समाजातील असे कृत्य करणाऱ्यांना संविधानात कोणत्याही परिस्थितीत माफी नाही. या घटनेंने न्यायव्यवस्थेची दक्षता आणि कठोरता सिध्द झाली आहे, आणि अशी शिक्षा भविष्यात अशा कृत्यांवर कडक नियंत्रण ठेवण्यास सज्ज आहे.