Thursday, March 12, 2026 10:27:25 PM

Rashmika-Vijay Wedding : आपली भावी सून कशी असावी? रश्मिकाच्या होणाऱ्या सासूबाईंनी मांडल्या 'या' 3 अटी

विजय देवरकोंडाची आई माधवी यांनी एका जुन्या मुलाखतीत आपल्या होणाऱ्या सुनेकडून असलेल्या अपेक्षा स्पष्ट केल्या होत्या. त्यांनी प्रामुख्याने 3 गोष्टींवर भर दिला होता.

rashmika-vijay wedding  आपली भावी सून कशी असावी रश्मिकाच्या होणाऱ्या सासूबाईंनी मांडल्या या 3 अटी

Rashmika Mandanna and Vijay Deverakonda Wedding : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील 'नॅशनल क्रश' रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांच्या लग्नाचे सनई-चौघडे आता वाजणार आहेत. उदयपूरमध्ये 26 फेब्रुवारी 2026 रोजी हा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. या बिग फॅट वेडिंगच्या अवघ्या काही तास आधी विजय देवरकोंडाच्या आई-वडिलांनी आपल्या होणाऱ्या सुनेबद्दल म्हणजेच रश्मिकाबद्दल व्यक्त केलेल्या जुन्या अपेक्षांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

होणाऱ्या सासूबाईंच्या 3 माफक अटी
विजय देवरकोंडाची आई माधवी यांनी एका जुन्या मुलाखतीत आपल्या होणाऱ्या सुनेकडून असलेल्या अपेक्षा स्पष्ट केल्या होत्या. त्यांनी प्रामुख्याने 3 गोष्टींवर भर दिला होता: पहिली अट म्हणजे सुनेने विजयची (बाबूची) उत्तम काळजी घेतली पाहिजे. दुसरी अपेक्षा म्हणजे तिने विजयवर निस्वार्थी प्रेम करावे आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विजय चित्रपटसृष्टीत कार्यरत असल्याने, तिने त्याच्या कामाचे स्वरूप आणि व्यस्त वेळापत्रक समजून घेतले पाहिजे. रश्मिका स्वतः अभिनेत्री असल्याने ती या अटींवर नक्कीच खरी उतरेल, अशी चाहत्यांची भावना आहे.

सासऱ्यांची जात आणि धर्मावर स्पष्ट भूमिका
विजयचे वडील गोवर्धन राव यांनी मुलाच्या लग्नाबाबत अतिशय पुरोगामी विचार मांडले होते. "मुलाला ज्या मुलीशी लग्न करायचे आहे, त्याने खुशाल करावे, माझा त्याला कोणताही विरोध नाही," असे ते म्हणाले होते. विशेष म्हणजे, त्यांनी जात किंवा धर्म या गोष्टींना महत्त्व दिले नसल्याचे स्पष्ट केले होते. "मुलीची जात किंवा धर्म कोणताही असला तरी चालेल, फक्त ती भारतीय आणि शक्यतो दाक्षिणात्य असावी," अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. रश्मिका दाक्षिणात्य असल्याने तिच्या रूपाने त्यांना हवी तशीच सून मिळाली आहे.

हेही वाचा - Sanjay Leela Bhansali: धक्कादायक! वाढदिवसाच्या दिवशीच प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळींना हृदयविकाराचा झटका; कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू

लव्ह मॅरेज आणि पालकांची पसंती
याच कार्यक्रमात विजय देवरकोंडाने अरेंज मॅरेज आपल्यासाठी नसल्याचे स्पष्ट केले होते. "मी फक्त लव्ह मॅरेज करेन, पण माझ्या पालकांनाही ती मुलगी आवडली पाहिजे," असे त्याने नमूद केले होते. 2018 मध्ये आलेल्या 'गीता गोविंदम' चित्रपटाच्या वेळी रश्मिका आणि विजयची केमिस्ट्री पहिल्यांदा पडद्यावर गाजली होती. त्यानंतर अनेक वर्षांच्या डेटिंगनंतर अखेर हे जोडपे लग्नाचा निर्णय घेत आहे. पालकांची संमती आणि रश्मिकाची विजयच्या कुटुंबाशी असलेली जवळीक पाहता, विजयने आपली अट पूर्ण केल्याचे दिसते.

रश्मिकाची भावनिक पोस्ट आणि उदयपूरमधील सोहळा
नुकतेच रश्मिकाने तिच्या 'द गर्लफ्रेंड' या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी विजयचे आभार मानले होते. आपल्याला कठीण प्रसंगातून बाहेर काढण्यासाठी विजयने मोठी मदत केल्याचे तिने अप्रत्यक्षपणे सांगितले होते. उदयपूरमध्ये होणाऱ्या या सोहळ्यासाठी दोन्ही कुटुंबे दाखल झाली असून, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज या लग्नाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. लग्नासाठी निवडलेली 26 फेब्रुवारी 2026 ही तारीख चाहत्यांसाठी एक ऐतिहासिक क्षण ठरणार आहे.

हेही वाचा - Bigg Boss Marathi 6 : विशाल कोटियनच्या 'त्या' कृत्याने राखी सावंत संतापली; नेमकं काय घडलं? वाचा


सम्बन्धित सामग्री