Tuesday, February 17, 2026 08:49:28 AM

Rath Saptami 2026 : यंदा रथ सप्तमी कधी? जाणून घ्या अचूक तारीख, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

माघ महिन्यात येणारी रथ सप्तमी ही अत्यंत पुण्यदायी आणि धार्मिक दृष्ट्या महत्त्वाची तिथी मानली जाते. दरम्यान या वर्षी रथ सप्तमी कधी आहे, शुभ मुहूर्त, उपासनेची पद्धत आणि मंत्र जाणून घेऊया...

rath saptami 2026  यंदा रथ सप्तमी कधी जाणून घ्या अचूक तारीख शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

माघ महिन्यात येणारी रथ सप्तमी ही अत्यंत पुण्यदायी आणि धार्मिक दृष्ट्या महत्त्वाची तिथी मानली जाते. रथ सप्तमीला माघी सप्तमी, महाती सप्तमी, सप्त सप्तमी, पुत्र सप्तमी अशा विविध नावांनी संबोधले जाते. पुराणकथेनुसार, सृष्टीच्या पहाटे सूर्यदेवाचे पहिले किरण याच दिवशी पृथ्वीवर पडले होते. त्यामुळे या दिवशी सूर्यदेवाचा अवतार झाला असल्याचे मानले जाते. त्यामुळे रथ सप्तमीला सूर्य जयंती म्हणूनही ओळखले जाते. या दिवशी सूर्यदेवाची विशेष पूजा केली जाते.

हेही वाचा- Pandharpur Vitthal Rukmini Vivah Sohala : वसंत पंचमीच्या मुहूर्तावर सनई-चौघड्यांच्या सुरात पंढरीत रंगला विठ्ठल-रखुमाईच्या विवाहाचा देखणा सोहळा

असे मानले जाते की, या दिवशी उपवास करून सूर्यदेवाची पूजा केल्यास सर्व पापांचा नाश होतो आणि मनोकामना पूर्ण होतात. तसेच आरोग्य, दीर्घायुष्य आणि तेज प्राप्त होते. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्यनमस्कार, अर्घ्यदान आणि सूर्य मंत्रांचा जप केल्यास विशेष फलप्राप्ती होते. पद्म पुराण आणि भविष्य पुराणात या व्रताचे महत्त्व सविस्तर सांगितले आहे. त्यामुळे रथ सप्तमी हा दिवस आध्यात्मिक शुद्धीकरणाचा आणि नवीन ऊर्जेचा प्रतीक मानला जातो. दरम्यान या वर्षी रथ सप्तमी कधी आहे, शुभ मुहूर्त, उपासनेची पद्धत आणि मंत्र जाणून घेऊया...

हेही वाचा- Vasant Panchami Wishes : आपल्या प्रियजनांना द्या वसंत पंचमीच्या 'या' खास शुभेच्छा

उगवत्या तिथीनुसार, रथ सप्तमी 25 जानेवारी रोजी येईल. मात्र मराठी दिनदर्शिकेनुसार, रथ सप्तमी माघ महिन्यातील शुक्ल पक्षाची सप्तमी तिथी शनिवार 24 जानेवारी रोजी मध्यरात्री 12.40 च्या सुमारास सुरू होईल, तसेच रविवार, 25 जानेवारी रोजी रात्री 11.11 च्या सुमारास संपेल. दरम्यान रथ सप्तमीनिमित्त स्नान, दान, उपवास आणि सूर्यदेवाची पूजा करणे, दरम्यान सूर्यदेवाची पूजा, दान इत्यादी करण्यासाठी शुभ मुहूर्त सकाळी 11.13 ते दुपारी 12.33 आहे. तसेच स्नान करण्याचा सर्वोत्तम काळ सकाळी 5.32 ते 7.12 आहे.


सम्बन्धित सामग्री