Saturday, November 15, 2025 02:52:48 PM

रत्नागिरीत पुतळ्यांची रेडिओग्राफी

सदरच्या पुतळ्यांच्या ठिकाणी व्यक्ती किंवा जनावरांना इजा होण्याची संभावना जास्त असू शकते. त्यामुळे सुरक्षिततेसाठी 2 ते 5 डिसेंबर दरम्यान मध्यरात्री 1 ते 4 वाजेपर्यंत रस्ता आणि रहदारी बंद करण्यात येणार

रत्नागिरीत पुतळ्यांची रेडिओग्राफी 

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषद हद्दीतील विविध पुतळ्यांची रेडिओग्राफी करण्यात येणार आहे. यादरम्यान परिसरामध्ये रेडिएशन तयार होऊ शकते. यामुळे सदरच्या पुतळ्यांच्या ठिकाणी व्यक्ती किंवा जनावरांना इजा होण्याची संभावना जास्त असू शकते. त्यामुळे सुरक्षिततेसाठी 2 ते 5 डिसेंबर दरम्यान मध्यरात्री 1 ते 4 वाजेपर्यंत रस्ता आणि रहदारी बंद करण्यात येत आहेत, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी आज दिले.

या आदेशात असे म्हटले आहे की, पोलीस अधीक्षकांकडून प्राप्त अहवालानुसार, त्यांनी 2 डिसेंबर ते 5 डिसेंबर दरम्यान मध्यरात्री 1 ते 4 वाजेपर्यंत नगरपरिषद हद्दीतील विविध पुतळ्यांची रेडिओग्राफी करण्यासाठी पुतळ्याच्या परिसरातील रस्ते बंद करण्यास हरकत नाही, असा अभिप्राय दिला आहे.

वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी, 2 ते 5 डिसेंबर 2024 दरम्यान मध्यरात्री 1 ते 4 वाजेपर्यंत रत्नागिरी नगरपरिषद हद्दीतील विविध पुतळ्यांची रेडिओग्राफी केली जाणार आहे. यावेळी परिसरामध्ये रेडिएशन होण्याची संभावना आहे, त्यामुळे पुतळ्यांच्या ठिकाणी व्यक्ती किंवा जनावरांना इजा होण्याची शक्यता जास्त आहे. यामुळे संबंधित रस्ते बंद करण्यात येत आहेत. वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी आणि अनुचित प्रकार टाळण्यासाठी योग्य नियोजन करण्यात येईल. वाहतूक नियमनाबाबत जनतेला माहिती मिळावी, यासाठी मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 116 प्रमाणे वाहतुकीची चिन्हे उभारण्याची कार्यवाही पोलीस विभागाने करावी.


सम्बन्धित सामग्री