Wednesday, December 11, 2024 11:39:20 AM

Congress
काँग्रेसला धक्का, रवी राजांचा राजीनामा

मुंबई महापालिकेतले माजी विरोधी पक्षनेते आणि दीर्घ काळ पालिकेत काँग्रेसचे नेतृत्व करणारे रवी राजा यांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

काँग्रेसला धक्का रवी राजांचा राजीनामा

मुंबई : भाजपाने विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार करतानाच मुंबई महापालिकेसाठी तयारी सुरू केली आहे. या तयारीची झलक ऐन दिवाळीत दिसली. मुंबई महापालिकेतले माजी विरोधी पक्षनेते आणि दीर्घ काळ पालिकेत काँग्रेसचे नेतृत्व करणारे रवी राजा यांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. रवी राजा यांनी काँग्रेसमधील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. थोड्याच वेळात ते काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. 

रवी राजा हे सायनमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र पक्षाने संधी नाकारल्याने रवी राजा यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला. रवी राजा मुंबई काँग्रेसमधील मोठे नेते होते. सायन (शीव) मधून काँग्रेसने गणेश यादव यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेसचे नेते आणि पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा नाराज झाले. रवी राजा हे सायनमधून (शीव) पाचवेळा नगरसेवक राहिले आहेत. तर पाच वर्षे त्यांनी मुंबई महानगरपालिकेत विरोधी पक्षनेते म्हणूनही काम केले आहे. 

कोण आहेत रवी राजा ?

  1. रवी राजा हे मुंबई महापालिकेतले काँग्रेसचे बडे नेते 
  2. पाच वेळा मुंबई महापालिकेत काँग्रेसचे नगरसेवक 
  3. काँग्रेसचा महापालिकेतला चेहरा अशी ओळख 
  4. मुंबई विद्यापीठात एम कॉम पर्यंत शिक्षण 
  5. शीव मतदासंघातून होते इच्छुक 
  6. रवी राजांच्या उमेदवारीला अनेक वरिष्ठांचा पाठिंबा 
  7. रवी राजांना डावलून गणेश यादव यांना उमेदवारी 
  8. शीव कोळीवाड्यात तामिळ आणि मराठी मतदारांत राजा लोकप्रिय 

सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo