गोंदिया : राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या. त्यानंतर विधानसभा निवडणुकांचे अर्ज दाखल झाले. विधानसभेत उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी बंडखोरी करण्यास सुरूवात केली. असेच काहीसे चित्र अर्जुनी मोरगाव मतदारसंघात पाहायला मिळत आहे. महायुती आणि मविआला दोन्ही आघाड्यांमध्ये चित्र बिघडल्याचे पाहायला मिळत आहे. महायुतीमध्ये भाजपाचे रत्नदीप दहिवले यांनी बंडखोरी केली. तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचे अजय लांजेवार यांनी बंडखोरी केली. या दोन आघाड्यांमधील बंडखोरीमुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला फटका बसण्याची शक्यता आहे.