Sunday, November 16, 2025 09:22:02 AM

पवारांना निवडणूक आयोगाचा दिलासा

लोकसभा निवडणुकीत दहा जागा लढवून आठ जागा जिंकणाऱ्या शरद पवारांच्या नेतृत्वातील राशपला निवडणूक आयोगाने दिलासा दिला.

पवारांना निवडणूक आयोगाचा दिलासा

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत दहा जागा लढवून आठ जागा जिंकणाऱ्या शरद पवारांच्या नेतृत्वातील राशपला निवडणूक आयोगाने दिलासा दिला. निवडणूक चिन्हावरुन गोंधळ होऊ नये यासाठी राशपकडून निवडणूक आयोगाला एक विनंती करण्यात आली होती. ही विनंती निवडणूक आयोगाने मंजूर केली. यामुळे राशपला दिलासा मिळाला आहे. 

एखाद्या उमेदवाराला ट्रम्पेट चिन्ह देण्यात आल्यास त्याचा उल्लेख ट्रम्पेट असाच करण्यात यावा. त्याचा उल्लेख तुतारी असा होऊ नये, अशी मागणी राशपने केली होती. ही मागणी निवडणूक आयोगाकडून मंजूर झाली. यामुळे विधानसभा निवडणुकीवेळी निवडणूक चिन्हावरुन गोंधळ होणार नाही. याआधी लोकसभा निवडणुकीवेळी काही उमेदवारांना ट्रम्पेट हे निवडणूक चिन्ह मिळाले होते. या चिन्हाचे मराठी भाषांतर निवडणूक आयोगाने तुतारी असे केले होते. राशपचे निवडणूक चिन्ह हे तुतारी वाजवणारा माणूस असे होते. पण नामसाधर्म्यामुळे राशपला गोंधळाची भीती वाटत होती. या भीतीपोटी राशपने निवडणूक आयोगाला विनंतीपत्र पाठवले होते. हे पत्र मिळाल्यानंतर निवडणूक आयोगाने राशपची विनंती मान्य केली. 


सम्बन्धित सामग्री