Konkan Railway : कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या चार प्रमुख रेल्वेगाड्यांपैकी दोन गाड्यांना सिंधुदुर्ग (Sindhudurg) आणि दोन गाड्यांना कणकवली (Kankavli) रेल्वे स्थानकांमध्ये थांबा देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
प्रवाशांच्या मागणीचा विचार
कोकण रेल्वेवरील अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर प्रमुख रेल्वेगाड्यांना थांबा मिळावा, अशी मागणी प्रवासी सातत्याने करत होते. तांत्रिक अडचणींमुळे या स्थानकांवर थांबा देणे शक्य होत नव्हते, मात्र प्रवाशांची वाढती मागणी आणि सोय लक्षात घेऊन आता हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, कणकवली आणि सिंधुदुर्ग स्थानकांवर या रेल्वेगाड्यांना प्रायोगिक तत्वावर थांबा देण्यात येणार आहे.
सिंधुदुर्ग स्थानकात थांबा मिळालेल्या गाड्या (2 मिनिटे थांबा)
- एर्नाकुलम जंक्शन – अजमेर एक्स्प्रेस (गाडी क्र. 12977): या गाडीला 2 नोव्हेंबरपासून सिंधुदुर्ग स्थानकात थांबा सुरू झाला आहे. ही गाडी दुपारी 12.32 वाजता स्थानकात पोहोचेल.
- एर्नाकुलम एक्स्प्रेस (गाडी क्र. 12978): या गाडीला 7 नोव्हेंबरपासून सिंधुदुर्ग स्थानकात थांबा मिळेल. ही गाडी सकाळी 11.46 वाजता स्थानकात येईल.
- एर्नाकुलम जं. – हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस (गाडी क्र. 22655): या गाडीला 5 नोव्हेंबरपासून सिंधुदुर्ग येथे थांबा मिळणार आहे. गाडी सायंकाळी 7.08 वाजता स्थानकात थांबेल.
- हजरत निजामुद्दीन – एर्नाकुलम जं. एक्स्प्रेस (गाडी क्र. 22656): ही गाडी 7 नोव्हेंबरपासून सिंधुदुर्ग स्थानकात थांबेल. स्थानकात सकाळी 7.20 वाजता तिचे आगमन होईल.
हेही वाचा - Devgad Hapus: देवगड हापूसने मोडले सर्व रेकॉर्ड; पहिल्या पेटीला मिळाला 25 हजार रुपयांचा भाव
कणकवली स्थानकात थांबा मिळालेल्या गाड्या (2 मिनिटे थांबा)
- हिसार-कोयंबतूर एक्सप्रेस (गाडी क्र. 22475): या गाडीला 5 नोव्हेंबरपासून कणकवली येथे रात्री 9.46 वाजता थांबा देण्यात येईल. ही गाडी रात्री 9.48 वाजता पुढे मार्गस्थ होईल.
- कोयंबतूर-हिसार एक्सप्रेस (गाडी क्र. 22476): या गाडीला 8 नोव्हेंबरपासून कणकवली येथे सकाळी 6.30 वाजता थांबा मिळेल.
- गांधीधाम-नागरकोइल एक्सप्रेस (गाडी क्र. 16335): या गाडीला 7 नोव्हेंबरपासून कणकवली येथे पहाटे 5.45 वाजता थांबा देण्यात येईल.
- नागरकोइल- गांधीधाम एक्सप्रेस (गाडी क्र. 16336): या गाडीला 11 नोव्हेंबरपासून कणकवली येथे दुपारी 2 वाजता थांबा मिळेल. ही गाडी दुपारी 2.02 वाजता पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होईल.
हेही वाचा - Fish Prices Increases: खवय्ये हैराण! सुरमई-पापलेटचे भाव गगनाला भिडले