Municipal Corporation Election Reservation: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी वेगाने सुरू झाली आहे. नाशिक, कल्याण-डोंबिवली, पनवेल आणि नवी मुंबई या चार महापालिकांच्या निवडणुकांसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली असून, यामुळे आता उमेदवारांना आपापल्या प्रभागांतील आरक्षणानुसार तयारी करण्याची संधी मिळाली आहे.
नाशिक महापालिका आरक्षणाचा तपशील जाहीर
नाशिक महानगरपालिकेतील विविध विभागांसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि सर्वसाधारण प्रवर्गांनुसार आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. पंचवटी, सातपूर, पश्चिम, पूर्व, नाशिक रोड आणि सिडको विभागातील एकूण 31 प्रभागांसाठी ही सोडत काढण्यात आली. प्रत्येक प्रभागात महिला, अनुसूचित जाती-जमाती आणि ओबीसी प्रवर्गासाठी राखीव जागा निश्चित करण्यात आल्या असून, आरक्षणामुळे अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - Cabinet Meeting Decision : बँका, न्यायालये आणि शेती विकासासाठी फडणवीस सरकारचे मोठे निर्णय!
पनवेल महानगरपालिकेत महिलांसाठी 50 टक्के आरक्षण
पनवेल महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण 20 प्रभागांमधून 78 सदस्यांची निवड होणार आहे. यातील 50 टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. अनुसूचित जातींसाठी 6 जागा असून त्यापैकी 3 महिलांसाठी, तर अनुसूचित जमातीसाठी 2 जागांपैकी 1 जागा महिलांसाठी राखीव आहे. या आरक्षणामुळे महिलांच्या सहभागात लक्षणीय वाढ होणार असल्याचे मानले जात आहे.
हेही वाचा - Abu Azmi On Delhi Blast: 'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये...'; दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचं मोठं वक्तव्य
नवी मुंबई महानगरपालिका
नवी मुंबई महानगरपालिकेतील 28 प्रभागांपैकी 27 प्रभाग चार सदस्यीय आणि एक प्रभाग (क्रमांक 28) तीन सदस्यीय आहे एकूण 111 सदस्यांची निवड होणार असून, विविध प्रवर्गांसाठी आरक्षण खालीलप्रमाणे आहे.
अनुसूचित जाती: 10 जागा (त्यापैकी 5 महिलांसाठी)
अनुसूचित जमाती: 2 जागा (1 महिलेसाठी)
मागासवर्गीय: 29 जागा (15 महिलांसाठी)
सर्वसाधारण प्रवर्ग: 70 जागा (35 महिलांसाठी)
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका; 122 सदस्यीय रचना
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या 2025-2026 सार्वत्रिक निवडणुकीसाठी 122 सदस्यीय आरक्षण जाहीर झाले आहे. येथे 29 प्रभाग चार सदस्यीय आणि 2 प्रभाग तीन सदस्यीय असतील. आरक्षणानुसार
अनुसूचित जाती: 12 प्रभाग (6 महिलांसाठी)
अनुसूचित जमाती: 3 प्रभाग (2 महिलांसाठी)
ओबीसी: 38 प्रभाग (16 महिलांसाठी)
सर्वसाधारण: 75 प्रभाग (38 महिलांसाठी)
राजकीय तयारीला वेग
या आरक्षण सोडतीनंतर आता सर्व राजकीय पक्षांच्या तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये हालचाल सुरू झाली आहे. अनेक संभाव्य उमेदवार आपल्या प्रभागांतील गणित मांडण्यात व्यस्त असून, महिला आरक्षणामुळे नव्या नेतृत्वाला मोठी संधी मिळण्याची चिन्हे आहेत.