वर्धा : पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत असेपर्यंत आरक्षण रद्द होणार नाही. मोदी सरकार आहे म्हणून देशात राज्यघटनेची प्रभावीरित्या अंमलबजावणी सुरू आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते वर्धा येथील कार्यक्रमात बोलत होते. काही जण परदेशात जाऊन भारताची बदनामी करत आहेत. आरक्षण रद्द करण्याची भाषा करत आहेत. बाबासाहेबांनी जे आरक्षण दिलं आहे, ते कुणी रद्द करू शकत नाही. जोपर्यंत मोदी सत्तेत आहेत, तोपर्यंत कुणीही आरक्षण रद्द करू शकत नाही, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींवर टीका केली.