बंगळुरू : भारतीय क्रिकेट संघाला गुरुवारी बंगळुरू कसोटीत दोन धक्के बसले. आधी भारतीय संघाचा पहिला डाव ४६ धावांत आटोपला. भारताचे पाच फलंदाज शून्यावर बाद झाले. रिषभ पंत आणि यशस्वी जयस्वाल वगळता इतर कोणालाही दोन आकडी वैयक्तिक धावा करणे जमले नव्हते. या धक्क्यातून सावरण्याआधीच भारताला दुसरा धक्का बसला. रिषभ पंतच्या उजव्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली. क्षेत्ररक्षण करताना पंतला ही दुखापत झाली. या दुखापतीमुळे रिषभ पंतला मैदान सोडावे लागले. दुखापतीतून पंत सावरला नाही तर त्याच्या अनुपस्थितीत भारताला खेळावे लागेल.
नेमके काय घडले ?
कॉनवेला अश्विनने ३७ व्या षटकाचा शेवटचा चेंडू टाकला. हा चेंडू कॉनवेला समजला नाही आणि तो गडबडला. आता कॉनवे बाद होणार असे वाटत असताना अश्विनच्या हातातून वेगाने सुटलेला चेंडू थेट पंतच्या गुडघ्याला लागला. यामुळे पंतच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली. पंतची ही दुखापत गंभीर होती. त्यामुळे त्याला मैदानाबाहेर नेण्यात आले. पंतची जागा ध्रुव जुरेल या बाराव्या खेळाडूने घेतली.
भारत विरुद्ध न्यझीलंड दुसरी कसोटी, बंगळुरू
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला
भारताचा पहिला डाव : सर्वबाद ४६ धावा
न्यूझीलंडचा पहिला डाव : ३ बाद १८० धावा